आलेगाव बंधाऱ्याच्या मागणीसाठी नदीपात्रात आंदोलन दिवसभर धरणे आंदोलन व रात्री भजन किर्तनाने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी होतोय प्रयत्न

प्रतिनिधी-प्रदिप पाटील आलेगाव खुर्द (ता. माढा) येथील भीमा नदीवर बंधारा बांधण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी नदीपात्रामध्ये आंदोलन सुरू केले आहे. पंचवीस वर्षापासून बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने आलेगाव खुर्द, रुई, गारआकोले, इंदापूर तालुक्यातील भांडगाव, सुरवड या गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.भीमा नदीवरील आलेगाव खुर्द-भांडगाव येथील नदीपात्र उथळ असल्याने नदीपात्रामध्ये पाणी साठवून राहत नाही. […]

माऊली शिक्षण संस्थेत जिजाऊ सावित्री विवेकानंद संयुक्त जयंतीनिमित्त विविध स्पर्धात्मक व समाज उपयोगी उपक्रम

बेंबळे /प्रतिनिधी :दत्तात्रय सुरवसे लक्ष्मी आनंद विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज टेंभुर्णी येथे राजमाता जिजाऊ सावित्रीबाई व स्वामी विवेकानंद यांचा संयुक्त जयंती उत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शौर्य गीत व सावित्री वंदन गीत याद्वारे महानायकांना अभिवादन करण्यात आले.सदर कार्यक्रमादरम्यान प्रशालेच्या वतीने घेण्यात आलेल्या […]