नळदुर्ग शहराला ४३ कोटी ६७ लाख रुपये ची पाणीपुरवठा योजनेला प्रशासनाची मंजुरी
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग शहराची गरज लक्षात घेता नळदुर्ग करांची तहान भागावी म्हणून शहराला दररोज पाणीपुरवठा व्हावा यासाठी तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नाला आखेर यश मिळाले आहे .
बोरीधरण उशाला कोरड पडली घशाला या म्हणी प्रमाणे गेली अनेक वर्षा पासुन आठ दिवस आड पाणी पुरवठा होत होता नळदुर्ग ची जनता सुद्धा पाण्याला वैतागत होती पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचार्यावर शिव्यांची आंघोळ घालत होती नळदुर्ग शहराच्या सर्वांगिण विकासासाठी सतत प्रयत्नशिल आसणारे लोकप्रिय आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी मोठा पाठ पुरावा करून मानवाच्या जीवनातील महत्वाचा सुमारे ४३ कोटी ६७ लाख रुपये खर्चाची नवीन पाणी पुरवठा योजनेला केंद्र सरकारची अमृत अभियान अंतर्गत मंजुरी मिळाली आहे . यासाठी सातत्याने राज्य तसेच केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता शहरातील तब्बल ५ हजार ९५ घरांना नळ जोडणी होणार आसुन .या मध्ये पाण्याचा ६ टाक्या नवीन होणार आहेत , जलशुद्धीकरण केंद्र , पंप हाऊसच्या कामाचा समावेश आहे योजना पूर्ण झाल्यानंतर शहरात सात ते आठ दिवस नव्हे तर रोज पाणीपुरवठा होईल शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात यावी अशी मागणी मागील काही वर्षांपासून नागरिकांची होती अखेर केंद्र सरकारच्या अमृत अभियाना अंतर्गत ४३ कोटी ६७ लाख रुपये खर्चाच्या पाणी योजनेस मंजुरी मिळाली आहे .नळदुर्ग नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांचा प्रशासना स्तरावरील पाठ पुरावा आज कामी आला आहे .शहरासाठी जुनी पाणी पुरवठा योजना ही खुप जुनी आसल्यामुळे जिर्ण झाली आसणार आहे शहराची वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता महत्त्वाच्या व चुकीच्या पाईप लाईन मुळे काही भागात पाणी पुरवठाच होत नव्हता तर काही भागात अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता
नळदुर्ग शहर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित व्हावे यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहे त्यासाठी शहराच्या तरुण लोकसंख्येत अपेक्षित वाढ होणार आहे संभाव्य लोकसंख्या विचारात घेता नवीन पाणीपुरवठा योजनेचे खूप आवश्यकता होती ती मागणी विचारात घेऊन केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत २ ० ने हा या योजनेचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता दरम्यान बुधवारी झालेल्या राज्य तांत्रिक समिती बैठकीमध्ये सुमारे ४३ कोटी ६७ लाख कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेस अखेर मंजुरी मिळाले आहे सध्या परिस्थीतीत पाणीपुरवठा योजना शहराला ७ ते ८ दिवस आड पाणीपुरवठा न होता ही काम पुर्ण झाले की शहरातल्या नागरीकांचा महत्वाचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे आणी दररोज पाणी मिळणार आहे यामुळे नागरिकात समाधान व्यक्त केले जाणार आहे .