प्रतिनिधी-प्रदिप पाटील
आलेगाव खुर्द (ता. माढा) येथील भीमा नदीवर बंधारा बांधण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी नदीपात्रामध्ये आंदोलन सुरू केले आहे. पंचवीस वर्षापासून बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने आलेगाव खुर्द, रुई, गारआकोले, इंदापूर तालुक्यातील भांडगाव, सुरवड या गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.भीमा नदीवरील आलेगाव खुर्द-भांडगाव येथील नदीपात्र उथळ असल्याने नदीपात्रामध्ये पाणी साठवून राहत नाही. प्रत्येक वर्षी या भागातील शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. भीमा नदीच्या पाण्यावर परिसरातील गावांमधील पाणीपुरवठा योजनाही अवलंबून असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होतो. त्यामुळे आलेगाव खुर्द येथे भीमा नदीवर कायमस्वरूपी उपाय योजना म्हणून बंधारा बांधण्याची मागणी नागरिक करत आहेत.मागील लोकसभा निवडणुकीवरीलबहिष्कार तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आला. मात्र त्यानंतर काहीही न केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून वेगवेगळ्या पक्षाचे नेते मंडळी भेट देत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे अभिजित पाटील, दादासाहेब साठे, राष्ट्रवादी काँग्रेस माढा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब महाडिक देशमुख व भारत माने यांनी आंदोलन स्थळी भेटी देऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे यावेळी हरिभाऊ माने, सुभाष गायकवाड, कैलास शिंदे, सतीश केचे, हनुमंत काळे, प्रकाश माने,रमेश लवटे, तानाजी गायकवाड, निशांत पाटील, नंदकुमार गायकवाड, कल्याण वाघमारे, गणेश सोलनकर, सोमनाथ माने, दत्तात्रय कळसाईत, भाग्यवंत लांडगे, महेश गाडे, सोमनाथ झोळ, अरविंद गायकवाड, प्रवीण माने आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.चौकटफेब्रुवारी महिन्यापासूनच भीमा नदीपात्र कोरडेठाक पडले असल्याने पिण्याच्या पाण्याची आणि शेतीसाठी पाणी टंचाई निर्माण झाली असून, हा प्रश्न मार्गी न लागल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर चार गावातील शेतकरी बहिष्कार टाकणार आहेत- हरिभाऊ माने आंदोलनकर्ते.