अनंत चैतन्य च्या ” विज्ञान व सर्व विषय प्रदर्शनास” उस्फूर्त प्रतिसाद

अक्कलकोट प्रतिनिधी :- गौतम बाळशंकर

विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा, त्यांच्यात संशोधनवृत्ती वाढीस लागावी याकरिता गतवर्षापासून शालेय स्तरावर “विज्ञान व सर्व विषयाचे प्रदर्शन” भरवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदाही महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्य.व उच्च माध्यमिक प्रशाला,हन्नूर येथे बुधवार दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी “विज्ञान व सर्व विषय प्रदर्शन ” भरवण्यात आले होते. प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. आदरणीय श्री.पंचप्पा कल्याणशेट्टी सरांच्या व थोर शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पुजन पितापूर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक श्री.शंकर इंगोले सर व किणी प्राथमिक मराठी केंद्र शाळेच्या शिक्षिका सौ.श्रीदेवी देवरकोंडा यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले व संस्थेचे जेष्ठ संचालक तथा मार्गदर्शक श्री.मल्लिनाथ कल्याणशेट्टी सर यांनी फीत कापून प्रदर्शनाचे उदघाटन केले . यावेळी संस्थेच्या संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी,हन्नूरचे उपसरपंच श्री.सागरदादा कल्याणशेट्टी,संचालक श्री.मल्लिकार्जून मसूती, शिक्षणविभागाच्या प्रमुख सौ. रुपाली शहा,विज्ञान विभागाच्या प्रमुख सौ. पुनम कोकळगी,सौ.सुरेखा कल्याणशेट्टी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.मलकप्पा भरमशेट्टी,केंद्रप्रमुख श्री.गुरुलिंग व्हनमाने उपस्थित होते.विज्ञान प्रदर्शनास हन्नूर व किणी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी, उर्दू शाळेच्या व माध्यमिक प्रशालेच्या जवळपास ३५०- ४०० विद्यार्थी- विद्यार्थिनिनी व शिक्षक – शिक्षिका यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी भेट दिली. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी खूप जिज्ञासूपणे प्रयोगसाहित्याची माहिती घेत होते.अत्यंत कमी वेळात म्हणजे अवघ्या तीन – चार दिवसांतच याची तयारी करण्याकरिता वेळ मिळालेला असताना देखील प्रशालेच्या मुलां- मुलींनी अतिशय नाविन्यपूर्ण व सुंदररीत्या प्रयोगसाहित्याची मांडणी करून आत्मविश्वासपुर्वक आपापल्या प्रयोगसाहित्याच्या वैशिष्टयाचे विश्लेषण करत असल्याचे पाहून प्रदर्शनास भेट दिलेल्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी व शिक्षकवृदांनी प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक- शिक्षिका यांचे कौतुक केले. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. विलास बिराजदार, पर्यवेक्षक श्री. अशोक साखरे, समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.