प्रतिनिधी :- दौंड रावणगाव परशुराम निखळे
यवत पोलीसांनी आंतरराज्य व राज्याअंतर्गत गांज्याची वाहतूक व विक्री करणारी टोळी जेरबंद केलीय ( अठठ्यात्तर लाख दहा हजार पाचशे रुपये ) किंमतींचा मुद्देमाल केला जप्त केलाययवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातम् मिळाली की , सोलापुर पुणे हायवे रोडने दोन मालवाहतुक करणारे ट्रक हे आंध्रप्रदेश , कर्नाटक राज्यातुन पुणे येथे विक्रीसाठी गांजा घेवुन येणार असल्याची माहीती मिळाली असता. सदर मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी छापा टाकण्यासाठी दोन पथक तयार करून कायदेशीर बाबी , पंच आदिची पुर्तता करून पहाटे ०१:३५ वाजण्याच्या सुमारास पाटस गावापासून काही अंतरावर असलेले इंडीयन ऑईल पेट्रोलपंप व राजश्री व्हेज हॉटेलच्या विरुध्द बाजुस सोलापुर पुणे हायवे रोडच्या बाजुला असलेल्या सर्व्हिस रोडच्या कडेला सापळा लावुन ट्रक क्र. १ ) ए.पी / १६ / टी.जी . २२५६ व ट्रक २) ए.पी / ०७ / टी.एम . ७७९९ असे दोन मालवाहतुक करणारे ट्रक ताब्यात घेवुन सदर दोन्ही गाडयांचा पंचासमक्ष झडती घेतली असता दोन्ही गाडयामध्ये आरोपीत यांनी ड्रायवर सीटच्या बाजुला एकुण सहा पिशव्यामध्ये वेगवेगळया बंद पाकीटात एकुण १६७.२५ किलोग्रॅम असा ३०,१०,५०० / - रु . ( तीस ला दहा हजार पाचशे रुपये ) किंमतीचा गांजा व गुन्हयात वापरते दोन मालवाहतुक ट्रक ४८,००,००० / रु ( अटठ्ठेचाळीस लाख रुपये ) किंमत असा एकुण ७८ , १० , ५०० रूपये ( अठठ्यात्तर लाख दहा हजार पाचशे रुपये ) किंमतींचा गुन्हयामध्ये मुद्देमाल जप्त करुन पुरुष आरोपी नामे १ ) रविकुमार जागेश्वरराव पुपल्ला रा झमिदागुमिल्ली वागुमिल्ली ता.जि.किष्णा राज्य आंध्रप्रदेश २ ) रवि कॉटया अजमेरा रा . विजयवाडा ता.कंखीपाट जि . कृष्णा राज्य आंध्रप्रदेश ३ ) उमेश खंड्डु थोरात रा.मंचर ता.आंबेगाव जि.पुणे ४ ) युवराज किसन पवार रा.मुथळा ता.मुथळा जि . बुलढाणा ५ ) उत्तम काळु चव्हाण रा.करवंड ता . चिखली जि . बुलढाण ६ ) प्रकाश एन व्यंकेटेश्वराव रा . विजयवाडा ता.कृष्णा जि.कळीवाळ राज्य आंध्रप्रदेश ७ ) किसन शालीम पवार रा . मुथळा ता . मुथळा जि . बुलढाणा व महिला आरोपी नामे १ ) रुक्मिणीबाई रुपराव पवार रा . ढाकरखेड ता . चिखली जि . बुलढाणा २ ) मिना युवराज पवार रा.ढाकरखेड ता.चिखली जि . बुलढाणा ३ ) ममता उत्तम चव्हाण रा . करवंड ता . चिखली जि.बुलढाणा ४ ) लालाबाई देवलाल चव्हाण रा.चिखली ता.चिखली ज बुलढाणा ५ ) ललिता हिरालाल पवार रा . ढाकरखेड ता . चिखली जि . बुलढाणा असे ७ पुरुष ५ महिला असे एकुण १२ आरोपी अटक केले आहेत . NDPS कायद्या अंतर्गत सर्व आरोपीतांवर गुन्हा दाखल केल आहे . सदरची कामगिरी . पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण डॉ. अभिनव देशमुख अप्पर पोली अधिक्षक मिलींद मोहीते सो बारामती विभाग मा उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार , स.पो.नि केशव वाबळे , पो.स.ई पदमराज गंपले , पो.ना. गणेश सोनवणे , पो.ना. विशाल गजरे , पो.ना विकास कापरे पो.हवा . जे . एम . भोसले , पो.हवा . भानुदास बंडगर , पो.ना.रविंद्र गोसावी , पो.ना.मेघराज जगताप , पो.ना. महेंद्र चांदणे , पो.ना नुतन जाधव , पो.ना.प्रमोद गायकवाड , पो.शि. सुजित जगताप , पो.शि.दिपक यादव , पो . शि तात्याराम करे , पो.शि.गणेश मुटेकर , पो.शि. आनंद आहेर , म.पो.शि. धावडे , चालक सहा फौज . सत्यवान जगताप , पो.ना. विजय आवाळे , पोलीस मित्र रामा पवार , निखिल अवचट यांनी कारवाई केली आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत