दैनिक लोक सह्याद्री
प्रतिनिधी,हनुमंत सुरवसे
उस्मानाबाद जिल्ह्यातील बामणी गावामधून येसाजी कंक तरुण मित्र मंडळकडून स्वराज्यरक्षक राजमाता जिजाऊ आई साहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
राजमाता जिजाऊ साहेबांनी स्वराज्य निर्मिती साठी छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी राजे हे दोन अनमोल हिरे राष्ट्राला अर्पण केले, आणि त्यांच्यासमवेत कित्येक मावळ्यांनी स्वतःचे रक्त सांडे पर्यंत अगदी मृत्यूच्या खाईत जाऊन स्वराज्यासाठी आपले देह अर्पण केले.
आणि अशा स्वराज्यातील माझ्या गोरगरीब जनतेला जगावे तर शिवबा सारखे आणि मरावे तर संभाजी सारखे अशी प्रेरणा घेऊन अभिवादन केले.
या प्रसंगी बामणी गावचे मा.उपसरपंच शंकर मुळे, युवा नेते रविराज हरवले, युवा नेते कंचेश्वर डोंगरे व सर्व तरुण वर्ग उपस्थित होता.