latest

वृक्षारोपणासह रेखा ताईने जपली सामाजिक बांधिलकी

दौंड तालुका प्रतिनिधी-  परशुराम निखळे
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग आपण नेहमी ऐकतो निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणाला जपणे गरजेचे आहे म्हणूनच वृक्ष लावणे आणि त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे या पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या अनुषंगाने भाग्यदय बहुउद्देशीय संस्था तालुकास्तरावर कार्यरत आहे या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरणाचा ध्यास घेतलेल्या रेखाताई वृक्षारोपण व संगोपनाच्या बाबतीत खूपच अग्रेसर आहेत अंत्य कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करीत त्यांनी आपल्या कुटुंबाला हातभार लावत सावरले आहे लोक डाऊन काळात तब्बल दोन महिने वृक्षरोपण आसह गरजूंना मदत कार्य करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे सौ रेखा दिगंबर लांडे असे त्यांचे नाव आहे तालुक्यातील काजळेश्वर उपाध्ये या गावातील रहिवासी आहेत मनारखेड हे त्यांचे माहेर असुन 1997 मध्ये दिगंबर लांडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत असल्याने त्यांना आपले कुटुंब बरीच मदत झाली घरची परिस्थिती अंत्यत हलाखीची असल्याने पतीराजा सोबतच त्यांना ही कामे करावी लागत होती मजल दर मजल करत आपल्या संसाराचा गाडा वळताना त्यांनी 2012 मध्ये गावातील दहा महिलांचा एक बचत गट स्थापन केला या माध्यमातून पुढे अंतर्गत व्यवहारातून त्यांनी बँकेकडुन कर्ज घेतले आणि त्यातून म्हशी खरेदी केल्या व दुग्ध व्यवसाय सुरू केला सोबतच शिलाई मशीन वर टेलरिंगचे काम सुरू केले आणि कुटुंबाला हातभार लावला पुढे त्यांची बचत गटा साठी पंचायत समितीच्या माध्यमातून वर्धिनी म्हणून निवड झाली यावेळी त्यांना त्यांच्या शिक्षणाचा फायदा झाला आणि त्यांनी आपल्या कौशल्याचा बळावर तालुक्यात वाखाणण्याजोगे कार्य केले स्वतः हलाखीच्या परिस्थितीतून दिवस काढल्याने त्यांना लोकांच्या समस्यांची जाण होती म्हणूनच त्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढे आल्या आणि महिलांचे नेतृत्व करू लागल्या सोबतच आपली घरची परिस्थितीही सुधारू लागली पुढे त्यांनी अगरबत्ती व्यवसाय सुरू केला पतिराजांना फोटोग्राफीच्या व्यवसाय मध्ये मदत करणे शिलाई काम अशा विविध भूमिका निभावल्या त्यांना चार मुले असून त्यांचे शिक्षण सुरू आहे राज्यात आलेल्या कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉक डाउन नंतर सगळेच ताळतंत्र बिघडले अनेकांची कामधंदे बंद झाल्याने अनेक समस्या उद्धवू लागल्या अशा परिस्थितीत रेखाताई धनी गरजूंना जमेल ती मदत करण्याचा निश्‍चय केला आणि दहा एप्रिल पासून प्रत्यक्ष मदत कार्यास सुरुवात केली या दिवसापासून त्यांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन करणाऱ्या गरजू मजुरांना वस्तूची मदत केली 11 एप्रिल रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी स्वतः तयार केलेले शंभर मास्क आणि स्वतः तयार केलेल्या 50  त्याने सॅनिटायझरचे  वाटप केले तर 14 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 100 मास्क सह एक क्विंटल गहू व 50 किलो तांदुळाचे वाटप गावातील गरजूंना केले 22 एप्रिल रोजी वसुंधरा दिन साजरा करत 30 वृक्षाची लागवड केली पुढे 29 एप्रिल ला आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त साबण मास्क बिस्किट तर लहान मुलांना चॉकलेट अशाप्रकारे प्रत्येकी 150 कुटुंबांना वाटप करण्यात आले त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावात स्वच्छता अभियान राबविले या उपक्रमात त्यांच्या धनलक्ष्मी महिला बचत गटाच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला पुढेही दिवसागणिक सतत त्यांनी उपक्रम राबवीत नेले एके दिवशी त्यांनी गावातील दहा कुटुंबांना पर्यावरणाची माहिती दिली तर एका लग्नात वधू-वरांच्या माता-पित्यांना वृक्ष भेट देऊन पर्यावरणाचा संदेश दिला तर कुठे पक्षांसाठी झाडावर पाणवठे बांधले चोवीस मे रोजी त्यांनी ग्रामपंचायत मध्ये बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक दाखविले आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त काजळेश्वर सह कामरगाव व त्यांनी वृक्षारोपण केले त्यांनी सॅनिटायझरचे
वाटप करून जनजागृती केली 2 जून रोजी थर्मल यंत्राद्वारे बाहेरगावावरून आलेल्यांची तपासणी केली आणि त्यांना होम क्वारंटाईन करण्यासाठी आपल्या बचत गटाचे कार्यालय राहण्यासाठी दिले पाच जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त रेखा ताईंनी आपल्या बचत गटातील महिलांसह वटवृक्षाला धागे ना बांधता वटवृक्षाच्या रोपांची लागवड केली काजळेश्वर सह कामरगाव व खेर्डा येथे त्यांनी वृक्षारोपण मोहीम राबविली शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी लागणारे खते व बियाणे एकत्रितरीत्या खरेदी केले तर भान हे स्वस्त लागेल आणि आणण्याचा खर्चही वाचेल यादृष्टीने त्यांनी पुढाकार घेऊन गावातील 20 महिला बचत गटांच्या महिलांना एकत्रित करत 100 बॅग खत व 100 बॅगा बियाणे मुर्तीजापुर खरेदी केले आणि शेतकऱ्यांच्या फायदा करून दिला 19 आणि 22 जून रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा त्यांनी गावात वृक्षारोपण केले.

अशाप्रकारे सतत दोन महिने त्यांनी विविध उपक्रम राबवून आपले सामाजिक दायित्व निभावले आहे गरजूंना वाटण्यासाठी सध्याही त्या मास्टर आहे दररोज कुठला तरी उपक्रम त्यांच्या हातून घडून येत आहे चूल आणि मूल एवढाच महिलांचे विश्व असल्याचे सांगणार यासाठी रेखाताई चे कार्य म्हणजे सणसणीत चपराकच आहे कुटुंबाला हातभार लावण्यात सह चार मुलांचा सांभाळ करणे त्यांच्या अडचणी सोडवणे घरचा दुग्धव्यवसाय सांभाळणे आणि हे सर्व करत असताना सामाजिक जाणिवेतून अशा प्रकारे विविध प्रकारचे कार्य रवीने हे सगळे दीव्यच म्हणता येईल यासाठी लागणारा आत्मविश्वास जिद्द चिकाटी ेखाताई मध्‍ये स्पष्टपणे झळकत आहे दरम्यान त्यांनी दर दिवसाआड राबविलेले हे छोटे मोठे उपक्रम खूपच प्रशंसनीय आहेत दखलपात्र आहेत त्यांच्या अशा एकूणच कार्याची दखल घेऊन कारंजा पंचायत समितीने या वर्षी त्यांना जागतिक महिला दिना त्यांना बेस्ट कपल पुरस्काराने सन्मानित केले होते या कामी त्यांना वेळोवेळी प्रोत्साहित करण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या तालुका व्यवस्थापक वर्षा ज्ञानदेव ठाकरे सौ.वर्षा शाहू भगत यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे तसेच त्यांना जीवनात संघर्ष करत मार्गक्रमण करण्याची प्रेरणा त्यांच्या आई रमाबाई इंगळे यांच्याकडून मिळाली आहे पुढे आपल्यासारख्याच महिलांना सक्षम करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची त्यांची तयारी आहे हलाखीच्या परिस्थितीवर मात करून आपल्या कुटुंबाला सावरल्या सह लॉक डाऊन दरम्यान सलग महिन्यापर्यंत मदत कार्य करून तसेच वृक्षरोपण स्वच्छता अभियाना सारखे उपक्रम राबवुन रेखाताईंनी केलेली ही कामगिरी निश्चित दखलपात्र आणि कौतुकास्पद आहे म्हणूनच आम्ही त्यांच्या कार्याची दखल घेतली असून त्यांना लोक डॉन मधील हिरो या सदरात स्थान देत आहोत त्यांच्या या कार्याचा उल्लेख लोक डॉन मधील हीरोइन असाही करता येईल त्यांच्या एकूणच कार्याला आम्ही मानाचा मुजरा करत आहोत

You've successfully subscribed to loksahyadri.com
Great! Next, complete checkout for full access to loksahyadri.com
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.