latest

वीज मंडळाचा शेतकऱ्याला फटका बेंबळे येथे विजेच्या स्पार्किंग मुळे अडीच एकर ऊस उजळून खाक पाच लाख रुपयांचे नुकसान...

बेंबळे प्रतिनिधी - दत्तात्रय सुरवसे

वीज मंडळाच्या गलथान निष्काळजी व बेफिकीर कारभाराचा बेंबळे येथील बागायतदार राकेश रत्नाकर कुलकर्णी यांना फटका बसला असून मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वीज प्रवाह जोडणाऱ्या खटक्यामधून ( स्टार्टर मधून) विजेच्या ठिणग्या पडल्या व तेथून पुढे जाणार्‍या तारांमधूनही  ठिणग्या पडल्यामुळे राकेश कुलकर्णी यांचा अडीच एकर( एक हेक्टर) पक्व झालेला दोन-तीन दिवसात तुटून कारखान्यास जाणारा ऊस जळून खाक झाला आहे. यामुळे शेतकऱ्याचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रात सर्वत्र असलेला जैन ठिबक कंपनीचा ठिबक संच  जळून खाक झाला असून त्याचेही एक ते सव्वा लाख रुपये नुकसान झाले आहे. मंगळवार दिनांक १८ रोजी सायंकाळी पाच ते साडेपाचशे सुमारास राकेश रत्नाकर कुलकर्णी यांच्या गट नंबर ५५४/१/अ मध्ये   कान्हापुरी गावाकडे वीज पुरवठा करणारा मोठा स्टार्टर ( खटका) काही वर्षांपूर्वी बसवलेला आहे. मागील काही महिन्यापासून स्टार्टर चालू करताच त्यातून ठिणग्या पडतात व आज ही तो चालू करताच त्यातून  व तेथून पुढे वाहत जाणाऱ्या विद्युत तारा मधून देखील ठिणग्या पडून खाली असलेल्या उसाच्या फडाला आग लागली. या स्टार्टर मधून दूर पर्यंत ठिणग्या पडत आहेत अशी अनेक वेळा संबंधित वीज मंडळाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना कुलकर्णी यांनी तक्रार वजा कल्पना दिली होती, तरीपण याची निष्काळजीपणे कुणीही दखल घेतली नाही उलट दुर्लक्ष केले व आज याच मुळे ऊसाला आग लागली व कुलकर्णी यांचे किमान पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले. आगीच्या ज्वाळा दिसताच  गावातील शंभर ते दीडशे शेतकऱ्यांनी आज भिजवण्याचा प्रयत्न केला, यावेळी काहीजणांना भाजले, पोळले पण आग आटोक्यात  आली अन्यथा सभोवतालचा किमान पंचवीस ते तीस एकर ऊस जळून गेला असता. याबाबत तातडीने कारवाई होऊन संपूर्ण नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राकेश कुलकर्णी यांनी शासनाकडे केली आहे .याप्रकरणी वीज मंडळाला जबाबदारी घ्यावीच लागेल व तसेच महसूल आणि कृषी खात्याला पंचनाम्यात सहकार्य करावे लागेल अन्यथा आपण एफ आय आर दाखल करून जिल्हा ग्राहक मंचाकडे दाद मागणार असल्याचे सोलापूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे कार्यकारणी सदस्य व जिल्ह्यातील ज्येष्ठ भाजपा नेते रत्नाकर बेंबळेकर-कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

You've successfully subscribed to loksahyadri.com
Great! Next, complete checkout for full access to loksahyadri.com
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.