नळदुर्ग प्रतिनिधी
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे रामतीर्थ तांडा येथे दि . २५ ते ३० मार्च दरम्यान होणारे एन एस एस शिबीर राष्ट्रीय सेवा योजना विभाग नळदुर्ग व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ' ग्रामस्वच्छता व आरोग्य संवर्धनासाठी युवा ' विशेष वार्षिक शिबिराचे काल
उदघाटन झाले या कार्यक्रमाचे उदघाटन बालाघाट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष संभाजीराजे पाटील बाभळगावकर यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या पाहुण्यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे यांच्या हस्ते करण्यात आला । याप्रसंगी बालाघाट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष संभाजीराजे पाटील बाभळगावकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांनी स्वयंसेवकांना व रामतीर्थ ग्रामस्थांना उद्देशून राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात महाविद्यालयातील विध्यर्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून आपला सर्वांगिण विकास साधावा असे मत आपल्या विचारातून व्यक्त केले तसेच या कार्यक्रमास उपस्थित असलेले रामतीर्थ गावचे सरपंच बालाजी राठोड ,जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास संस्थेचे कोषाध्यक्ष ऍड. प्रदीप मंटगे , कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील , माजी प्राचार्य डॉ. मोहन बाबरे ,पर्यवेक्षक डॉ सुभाष राठोड ,प्रा. नेताजी जाधव रामचंद्र पवार , लक्ष्मण राठोड , विनायक राठोड , नामदेव पवार , नेमिनाथ चव्हाण यांच्या सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. एन. जी. शेरे , डॉ. एम. बी. भालेराव , डॉ. आर. एम. महिंद्रकर , डॉ. ए. एम. कांबळे , डॉ एस एस राठोड , डॉ. जे. एम. घोडके , डॉ संतोष पवार , प्रा. जी. टी. चिंचडवाड , डॉ. सचिन देवद्वारे यांनी परिश्रम घेतले । या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ .संतोष पवार यांनी केले तर आभार डॉ. निलेश शेरे यांनी मानले । प्रा. डॉ. दिपक जगदाळे नळदुर्ग