latest

चव्हाणवाडी सोसायटीतर्फे सभासदांना बारा टक्के लाभांश वाटप

टेंभुर्णी प्रतिनिधी -: नवनाथ नांगरे (सर)

माढा तालुक्यातील मौजे चव्हाणवाडी(टें) येथील चव्हाणवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बारा टक्के लाभांशाचे वाटप करण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चव्हाणवाडी तंटामुक्ती समिती अध्यक्ष अरुण बापू चव्हाण होते तर प्रमुख अतिथी म्हणून बँक इंस्पेक्टर अतुल धुमाळ, बाळासाहेब हुलगे तसेच बँक व्यवस्थापक अधिकारी संतोष वरपे यांचे प्रतिनिधी म्हणून अक्षय सुतार हे होते.
551 सभासद असणाऱ्या सोसायटी चा वसूल जवळपास 75 टक्के असून जिल्हा बँकेत एक कोटीची मुदतठेव ठेवणारी टेंभुर्णी परिसरातील एकमेव विकास सोसायटी असल्याचे मत यावेळी प्रास्ताविकात माजी चेअरमन नवनाथ नांगरे यांनी स्पष्ट केले
"सभासदांचे हित जोपासणारी सर्वोत्तम संस्था" अशा कौतुकास्पद शब्दात  सचिव संघटनेचे अध्यक्ष महादेव घाडगे यांनी आपले स्पष्ट मत मांडले
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे टेंभुर्णी शहर अध्यक्ष सोमनाथ काका कदम  म्हणाले की स्वर्गीय रघुनाथ आबांचा आदर्श समोर ठेवून माजी चेअरमन राहुल चव्हाण व विद्यमान चेअरमन सुभाष बापू इंदलकर पाटील यांनी उत्तम रित्या कामगिरी पार पाडली आणि त्यांना सर्व संचालकांचे मनापासून सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी हनुमंत चव्हाण यांनी " नियमित परतफेड करणाऱ्या सभासदांचे तोंडभरून कौतुक केले . बँक इन्स्पेक्टर अतुल धुमाळ यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन सोसायटीच्या सर्वांगिन विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
संचालक आणि सभासदांच्या सर्वांच्या सहकार्यातूनच आम्हाला बळ मिळत गेले म्हणूनतर आम्ही व सर्व संचालक सोसायटीला विकासाच्या उंची पर्यंत नेऊ शकलो असे मत विद्यमान चेअरमन सुभाष बापू इंदलकर यांनी मांडले
"यावेळी ॲड.सचिन चव्हाण यांनी गावाच्या मधोमध जिथं रघुनाथ आबांचा सहवास आणि वावर होता त्या ठिकाणी नाममात्र भाड्याने गाळा उपलब्ध करून देऊ" अशी घोषणा केली.
यावेळी सभासदांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले. 12 टक्के लाभांश उद्या सर्वांच्या खात्यावर दुपारपर्यंत जमा होईल असे माजी चेअरमन राहुल चव्हाण म्हणाले. यावेळी चेअरमन आणि संचालकांच्या वतीने सर्व मान्यवरांचा आणि ज्येष्ठ सदस्यांचा सन्मान करण्यात आला तसेच सर्वांना चहा आणि अल्पोपहार देण्यात आला

या कार्यक्रमासाठी सोसायटीचे व्हा.चेअरमन दगडु अण्णा क्षीरसागर, सचिव दादासो नांगरे, क्लार्क अशोक भोसले, ज्येष्ठ सभासद भागवत भाऊ जगताप, चंद्रभान चव्हाण, आप्पा खडके, सौदागर नांगरे, भीमराव जाधव, शिवाजी जगताप, नवनाथ जाधव, संभाजी चव्हाण, जगन्नाथ जाधव, पोलीस पाटील हनुमंत इंदलकर पाटील, पोपट सलगर, विठ्ठल सरडे, रामचंद्र इंदलकर पाटील, राजाराम रायचुरे, तुकाराम इंदलकर, संचालक दत्तू नाना खरात, संजय काका मिस्कीन, सौ.संगीता भीमराव नांगरे, सरपंच सुनील बापू मिस्किन, भाजप अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष जमाल काझी तसेच अनिल दादा नांगरे, धनाजी इंदलकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ शिंदे, कल्याण नांगरे, अनिल चव्हाण, माजी संचालक रमेश आप्पा नांगरे, भीमराव नांगरे, चांगदेव पवार, गणेश लक्ष्‍मण जाधव, अविनाश जाधव, रोहन काका चव्हाण, सुनील तानाजी चव्हाण, भाऊसाहेब इंदलकर, संग्राम चव्हाण, बाळासाहेब खडके, नंदकुमार मुळे पाटील, सागर इंदलकर पाटील, दीपक चव्हाण, सिद्धेश्वर सलगर, विजय कदम, दिनेश चव्हाण, संजय गायकवाड, तानाजी जगताप, मारुती शिंदे, हरी जगताप, विजय पवार, निसार काझी, बाळासाहेब इंदलकर पाटील, लहू जाधव, प्रदीप खडके, संभाजी ब्रिगेडचे भारत जगताप पाटील, गन्नीसो काझी, तेजस इंदलकर पाटील, इसाक काझी, गोरख नागरे, राजेंद्र मोरे, विशाल भोसले, गजेंद्र नागरे, बाळासाहेब चव्हाण-ढेकळे, कुदरत काझी, भालू काका इंदलकर पाटील, दादासो काझी, यांच्या सन्मानाबरोबरच पत्रकार म्हणून हरिश्चंद्र गाडेकर सर धनंजय भोसले आणि नवनाथ नांगरे सर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
सदरच्या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने सभासद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

You've successfully subscribed to loksahyadri.com
Great! Next, complete checkout for full access to loksahyadri.com
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.