दौंड / रावणगाव :- परशुराम निखळे
कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील एअर्थकेम कंपनीमधील एका परप्रांतीय कामगारांच्या पायाला दुखापत होऊन पाय दोन ते तीन जागेवरती मोडला होता संबंधित कंपनीमध्ये कसल्याही प्रकारची सेफ्टी सुरक्षा साधने देत नसल्याने असे अपघात होत असल्याचं कामगार बोलत आहे. या कंपनीमध्ये या कामगाराला सेफ्टी शूज न दिल्याने या कामगाराच्या पायावरती केमिकल ने भरलेले बॅरल व ट्रॉली पायावर पडल्याने या कामगारांच्या पायाला दुखापत होऊन पाय मोडला याबाबत घडलेला अपघात हा संबंधित कंपनीने जाणीवपूर्वक संबंधित औद्योगिक सुरक्षा विभागाला न कळवता हा अपघात दडपण्याचा प्रयत्न केला आहे तरी संबंधित औद्योगिक सुरक्षा विभाग या अर्थकेम कंपनीवर काय कारवाई करणार हे पाहणं निश्चित ठरतंय. अपघात होऊन दहा ते बारा दिवस उलटूनही औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी संबंधित कंपनीमध्ये या अपघाताची माहिती घेण्यासाठी आले नसल्याचे बोललं जातंय तरी संबंधित कंपनी व संबंधित औद्योगिक सुरक्षा अधिकारी यांचे काही लागेबंद आहे काय असा सवाल या औद्योगिक वसाहत मधील कामगार वर्ग तसेच स्थानिकांमधून बोललं जातंय तरी संबंधित कंपनीवर संबंधित औद्योगिक सुरक्षा विभाग काय कारवाई करणार असा सवाल कामगार व स्थानिक करत आहे.

अर्थकेम कंपनीमध्ये घडलेल्या अपघाताबाबत संबंधीत औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता या अपघाताबाबत आम्ही संबंधित कंपनीवर काय कारवाई करायची ते करू असे उडवा उडवी ची उत्तरे देत आहे.