दैनिक लोक सह्याद्री ई न्युज
मावळ प्रतिनीधी - रोहित चोपडे
कार्ला दी.२२: कार्ला गावठाणातील शिवशंकर मंदिराचा बारावा वर्धापन दिन भक्तीमय व मोठ्या उत्साही वातावरण साजरा करण्यात आला.
मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यापासून दरवर्षी मंदिराच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे शिवशंकर तरूण मंडळाच्या वतीने आयोजन केले जाते. यावर्षी बाराव्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. सकाळी गणेश हनुमंत हुलावळे यांच्या हस्ते महारूद्र अभिषेक करण्यात आला. सायंकाळी हभप राजेंद्र महाराज दहीभाते यांचे किर्तन झाले. किर्तनास नवमी भजनी मंडळ भांगरवाडी व ग्रामीण परीसरातील सदस्यांनी साथ संगत केली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्ला व पंचक्रोशीतील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर दिवसभर भक्तीमय व उत्साही वातावरण सुरू असलेल्या कार्यक्रमाची सांगता झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे शिवशंकर तरूण मंडळाच्या वतीने आयोजन व संयोजन करण्यात आले होते.