
दौंड तालुका प्रतिनिधी - परशुराम निखळे
दौड तालुक्यातील मलटण वाटलूज सिरापुर येथील भीमा नदी पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणी गाव कामगार तलाठी यांनी वाळू माफियांना उपकरात्मक संदेश देत जाणीवपूर्वक कारवाईला बगल दिली आहे,
मलटण शिरापुर वाटलूज हद्दीत भीमा नदीच्या पात्रात दिवसाढवळ्या फायबर बोटीच्या साहाय्याने आणि ट्रकमधून चोरून वाळू वाहतूक होत असताना महसूल यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प आहे. त्यामुळे वाळू तस्करांचे चांगलेच फावले आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून भीमा नदीतुन वाळू पट्यातून सर्रास अवैध वाळू उपसा सुरू असताना तालुका महसूल प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे पावत आहे. वाटलूजचे तलाठी व मंडल अधिकारी यांचे वाळू चोरांसोबत अर्थपूर्ण संबंध असल्याने त्यांची शासकीय अधिकारी ओळख पुसून वाळू माफियांचा रक्षक अशी ओळख निर्माण होत असल्याने महसूल विभागाचे लागेबांधे असावेत म्हणूनच कारवाई होत नसल्याचीही चर्चा परिसरात सुरु आहे,, यामुळे वाळू माफियांवर कारवाई करण्यास स्थानिक महसूल विभाग जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत असे चित्र निर्माण झाले आहे,मडल आधिकारी यांना विचारले आसता मी चौकशी करून तलाठी यांना कारवाई करण्यास साागतो आसे उडवा उडवीचे उत्तरे देत आसतात
प्रशासकीय यंत्रणा वाळू माफियांवर कारवाईकडे दुर्लक्ष करीत असल्याने सरकारचा लाखो रुपयांचा महसूल वाया जात आहे. तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीला बहुतांशी वाळू माफिया जबाबदार आहेत. पाण्याची पातळी खालावत चालली असताना नदीच्या सौंदर्याचा -हास करणा-या, बेकायदा वाळू उपसा करणा-या वाळू माफियांनी वेळीच वाळू उपसा बंद न केल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागले,
महसूल प्रशासन वाळू माफियांपुढे हतबल झाले का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. रोज दिवसरात्र पंधरा ते वीस ट्रक अवैध वाळू नदी पात्रातून सर्रासपणे काढली जाते हे सर्व महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने चालत असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे, सध्यस्थितीला नदीच्या काही भागात शोधून पाहिले तरी वाळू दिसेनाशी झाली आहे. आजच्या घडीला या पात्राकडे पाहिल्यानंतर हेच का ते भीमा नदीचे पात्र असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत चालला आहे या नदीचे भविष्यात काय होईल ? भीमा नदीची पात्राचे काय होणार असा प्रश्न येथील नागरिकांच्या मनात निर्माण झाला असल्याने जिल्हा अधिकारी यांनी वैयक्तिक लक्ष देऊन मलटण ख वाटलूज हद्दीतील सर्व वाळू माफियांवर वेळीच लगाम घालून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे,