latest

उमेद च्या महिलांकरिता मशरूम प्रशिक्षण कृषिविज्ञान केंद्र करडा आणि रिलायन्स फाऊंडेशन चा उपक्रम

दौंड प्रतिनिधी - परशुराम निखळे

दि .24  डिसेंबर   २०21 – कृषी विज्ञान केंद्र करडा  आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम काजळेश्वर येथे पोषण वृद्धीसाठी मशरूम लागवड वं उत्पादकता विकास प्रशिक्षण  हा प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी उपस्थित महिलांना उत्पादनासाठी लागणारे स्पोन्स ,

या कार्यक्रमाकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ शुभांगी वाटाणे ह्या होत्या उपस्थित महिलांना त्यांनी मशरूम उत्पादन कसे करायचे ते प्रात्यक्षिक द्वारे समजावून सांगितले . शेती कोरडवाहू, सतत दुष्काळ स्थिती, त्यामुळे हाती किती पीक लागेल, याची खात्री नाही, एखाद्या वर्षी पाऊस चांगला पडल्यास पिकावर कीड, आळीचा हल्ला. , रोजगाराचा अभाव या मुळे महिला आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या आहेत तसेच मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या कि अळंबी हे एक उच्च प्रथिने असलेले अन्न असून, ते पाचक आहे. आहारात समतोल राखण्यासाठी व शरीर निरोगी

ठेवण्यासाठी आवश्यक असलेली मूलद्रव्ये अळंबीमध्ये असतात. अळंबीमध्ये ब-१, ब-२ व क जीवनसत्त्वे, पालाश, कॅल्शियम, सोडियम, स्फुरद, लोह आदी भरपूर प्रमाणात आहेत. अळंबीमध्ये शरीर वाढीसाठी आवश्यक अमिनो आम्ले असल्याने लहान मुलांना फारच उपयोगी अन्न म्हणून सिद्ध झाले आहे. अळंबीमध्ये पिष्टमय पदार्थ व शर्करा अत्यल्प प्रमाणात असल्याने उच्च रक्तदाब असणाऱ्यांना गुणकारी, आरोग्यवर्धक आहे. कर्करोग, हृदयरोग, अर्धागवायू, संधीवात, मधुमेह आदी रुग्णांसाठीही आळंबी खाणे चांगले असते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन जिल्हा व्यवस्थापक विलास सवाने तसेच गोपाल पवार यांनी केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी उमेद तालुका अभियान व्यवस्थापक आरती मॅडम ,लांडे मॅडम  यांनी सहकार्य केले

You've successfully subscribed to loksahyadri.com
Great! Next, complete checkout for full access to loksahyadri.com
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.