माढा ता. प्रतिनिधी - श्रीकांत मासुळे
दि 23 टेंभुर्णी शहर हे माढा तालुक्यातील पुणे सोलापूर हायवे वर वसलेले व विदर्भ मराठवाडा प्रवेश द्वार म्हणून महाराष्ट्रात ख्याती असलेले महत्त्वाचे हायवे जंक्शन.परंतु या शहराचा विकास पाहता तालुक्यातील शेजारच्या जिल्ह्यातील व तालुक्यातील शहरांच्या तुलनेत का होत नाही. या शहराच्या विकासाच्या झारीतील खरे शुक्राचार्य कोण? असा प्रश्न टेंभुर्णी करांना पडल्याशिवाय राहत नाही. पंचवीस-तीस हजार लोकसंख्या असलेल्या व महाराष्ट्रातील महत्त्वाचे धरण उजनी धरणा पासून जवळच असलेल्या या शहराचा शैक्षणिक आर्थिक व सामाजिक मागासलेपणा नक्कीच डोळ्यात खुपल्या शिवाय राहातं नाही.जवळच असलेल्या उजनी धरणामुळे मुबलक पाणी परिसरातील पंधरा-सोळा खेड्यातील सुपीक जमीन त्यामुळे टेंभुर्णी शहराचे बाजार पेठ पूर्वी नेहमी फुललेली असायची पिंपळनेर पासून ते गार अकोले पर्यंत आसपासची सर्व खेडी याच शहरात धनधान्य व आपले पशुधन विक्री साठी घेऊन येत असे. परंतु गुंठेवारी ला सोकावलेल्या पुढारर्यांनी येथील बाजार पेठ उध्वस्त केली. पुणे सोलापूर हायवे च्या बाजुला असणारर्या शासकीय भूखंडावर डोळा ठेऊन हायवे शहराबाहेरुन काढला. याच बरोबर बाजारपेठ जनतेच्या करातुन येणाऱ्या मुबलक पैस्यातुन शहराला सुविधा उपलब्ध करून देण्यात राजकीय लोक कमी पडले. प्रत्येक कामात भ्रष्टाचार करण्यासाठी कामे निकृष्ट दर्जाची करुन शहर बकाल करून टाकले. निधी येतो भरमसाठ पण तो जातो कुठे, आजपर्यंत चा जेवढा निधी आला त्याचा हिशोब जरी लावला तर पूर्ण टेंभुर्णी चा विकास होऊ शकतो. टेंभुर्णी मध्ये तळ्यासाठी आलेला निधी 15 लाख रुपये होता. पण तो निधी तळ्यांच्या दुरुस्तीसाठी होता का? पूर्ण तळे नव्याने दुरुस्तीसाठी होता? बघा नाहीतर तारेचे कंपाउंड टाकून १५ लाख किंमत होईल. शासनाकडून येणारया निधी चा पुरेपूर वापर होत नसून कुठे तरी निकृष्ट दर्जाचा मटरेल वापरून गाव विकासाची कामे टेंभुर्णी ग्रामपंचायत मार्फत होत आहे.२५ - ३० हजार लोकसंख्या असलेल्या या शहरातच ना रस्ते ना शुद्ध पाणी शौचालय, मुतारर्याच्या जागांवर डोळा ठेवून त्या उद्ध्वस्त करून ती जागा बळकावण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या बगलबच्चे ना सहकार्य केले. टेंभुर्णी शहरामध्ये पुरुषांसाठी व महिलांसाठी एकाही मुतारी ची सोय टेंभुर्णी ग्रामपंचायतला करता न यावी यासारखी दुर्दैवाची गोष्ट टेंभुर्णी करांसाठी काय असेल. ग्रामपंचायत मधील अधिकारी व कर्मचारी यांच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी हेच गाव पुढारी सरसावले . बाजार तळावरील जागा बळकावण्यासाठी गाळे बांधकाम करून बाजार समितीच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी नको ते व्यावसायिक त्याठिकाणी आपले व्यावसाय करु लागले. त्यामुळे शहराचा विकास खुंटला टेंभुर्णी शहरातील या सर्व दुरावस्थेला हे सर्व लोक प्रतिनिधी व अधिकारी जबाबदार असून टेंभुर्णी शहराचा विकास साधायचा असेल तर या ठिकाणी असलेला जनावरांचा बाजार त्याच शेतीमालाचा व्यापार याला चालना द्यावे लागणार आहे. तरच टेंभुर्णी शहर पुन्हा विकासाकडे वाटचाल करेल अशी चर्चा टेंभुर्णी मधून होत आहे.