अटीतटीच्या निवडणुकीत हिराबाई कोळपे यांचा सात मतांनी विजय..

टेंभुर्णी प्रतिनिधी नवनाथ नांगरे
येथील टेंभुर्णी ग्रामपंचायत वार्ड क्र.१ ची पोटनिवडणूक वाघे यांना तीन अपत्ये असल्यामुळे सदस्यत्व रद्द करण्यात आल्यामुळे लागली.तथापि त्या जागी २१ डिसेंबर २०२१ रोजी म्हणजे कालच मतदान झाले.
कुटे पार्टीकडून हिराबाई प्रभाकर कोळपे व बोबडे पार्टीकडून कु.अमिता मारुती भानवसे निवडणूक लढवीत होत्या.भानवसे यांना पोटनिवडणुकीत सात मतांनी पराभव स्वीकारावा लागला.ही निवडणूक दोन्ही गटाकडून प्रतिष्ठेची बनली होती.भानवसे यांचे चिन्ह कपबशी तर कोळपे यांची चिन्ह शिट्टी होते.शिट्टीला एकूण 795 मध्ये तर कपबशी ला 788 मते मिळाली. यामध्ये 23 मतदारांना दोन्ही पार्टीचे उमेदवार मान्य नव्हते.कुटे पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गावातून अगदी वाजत गाजत विजयी मिरवणूक काढली.तोफांची सलामी देत व गुलालाची उधळण करत सरपंच व कार्यकर्ते सर्वांनी मिळून आनंद उत्सव साजरा केला.या विजयी मिरवणुकीमध्ये कुटे गटाचे टेंभुर्णी गावचे प्रथम नागरिक सरपंच प्रमोद कुटे,पंचायत समिती सदस्य वैभव कुटे,राष्ट्रवादीचे नेते रावसाहेबनाना देशमुख,शिवसेना शहर प्रमुख सुरेश लोंढे,बाळासाहेब कोठारी,सोमनाथ कदम,गोरखबप्पा देशमुख,नारायण भानवसे,महेंद्र वाकसे,विलास देशमुख,राजेश बागवाले,समाधान देशमुख,अजित सोनमिडे,अशोक कोठारी,तानाजी येवले-पाटील, शिवसेना शहर उपप्रमुख संतोष खैरमोडे,दादा कोळपे,विठ्ठल कोळपे, समाधान घळके,नागेश लोंढे,पंकज जाधव,राहुल तरटे,सुनील कांबळे, अजित कांबळे,बाळासाहेब पोतदार, विकास देशमुख,रोहित देशमुख,साधू मदने,गणेशबापू केचे,सोमनाथ साळुंखे, शैलेश ओहळ,वैभव आटकळे,लखन माने,प्रशांत देशमुख,रोहिदास थोरात, जीवन राऊत,इम्तियाज तांबोळी,ऋषी कांबळे,अजित जाधव,धनंजय जाधव, अजय कांबळे,इस्माईल तांबोळी,धनू लाकोळे,संतोष कुटे,सुनील कोळेकर, विलास कांबळे,शाहरुख आतार, अक्षय घोडके,गणेश सोनिग्रा,कपिल कोठारी,शकील तांबोळी,दत्ता कुटे, नागेश देशमुख,यश कुटे,रोहन थोरात, बिटू केचे,कपिल खुळे,विकास खुळे, संतोष सटाले,सचिन चव्हाण,संतोष अण्णा कुटे,पिंटू लोंढे,राज कुटे, नागनाथ कोळपे इत्यादी कार्यकर्ते विजयी मिरवणुकीत सहभागी होते. शेवटी दत्त मंदिर येथे मिरवणुकीची रूपांतर सभेत झाले.यावेळी सरपंच प्रमोद कुटे,रावसाहेबनाना देशमुख,सुरेश लोंढे,सोमाकाका कदम,नारायण भानवसे,गणेशबापू केचे आदींनी आपले विचार व्यक्त केले आणि त्या ठिकाणी मिरवणुकीची सांगता झाली.