latest

टेंभुर्णी पोटनिवडणुकीत 75% तर वेणेगांव 86.70% मतदान

टेंभुर्णी प्रतिनिधी नवनाथ नांगरे
टेंभूर्णी, तालुका माढा येथे वार्ड क्रमांक एकची पोटनिवडणूक टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे कर्मचारी, निवडणूक अधिकारी व गावातील निवडणूक प्रतिनिधी यांच्या सहाय्याने शांततेत पार पडली.एक नंबर वॉर्डामध्ये एकूण मतदार 2163 पैकी 1608 मतदान झाले. मतदान टक्केवारी 75 टक्क्या पर्यंत पोहोचली.
सकाळी मतदारांमध्ये निरुत्साही वातावरण दिसून आले होते.त्यामुळे दुपारपुर्व मतदानाची टक्केवारी खूपच कमी दिसून आली.परंतु दुपार नंतर भली मोठी लांब रांग लागलेली दिसून आली.कारण एक नंबर वॉर्डामध्ये मतदार हे जवळपास शेतकरी असल्याने आपली कामे उरकून  दुपारनंतर ते मतदानाला आल्यानंतर पुष्कळ प्रमाणात गर्दी झालेली दिसून आली.सायंकाळी चार वाजेपर्यंत 65 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.चार वाजता एकूण 1400 मतदान झाले.मतदान कसे जास्तीत जास्त करता येईल याकडे दोन्ही पार्ट्यांचे लक्ष होते हे दिसून आले. टेंभुर्णी तील इंदापूर वेशीजवळ कुटे आणि बोबडे दोन्ही गटांचे लीडर्स टीम आपापले कार्यकर्त्यांसह उपस्थित राहून मतदारांना चांगला प्रतिसाद देत होते मतदान खेळीमेळीच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडले प्रत्येक कार्यकर्ता मतदारांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करत होते.मतदान झाल्यानंतर दोन्ही पार्टीचे कार्यकर्ते आमचाच उमेदवार विजयी होईल असा दावा करत होते.
मतदान पार पाडण्यासाठी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, उपनिरीक्षक मोनाली पवार,ए एस आय राजेंद्र डांगे, पोलीस नाईक ठोंबरे, पोलीस हवालदार गोळे, पोलीस कॉन्स्टेबल ननवरे,पवार व त्यांचा सर्व स्टाफ, टेंभुर्णीचे मंडल अधिकारी मनीषा लकडे,तलाठी स्वप्नील सोनटक्के, कोतवाल दीपक काळे इत्यादींनी परिश्रम घेतले.

वेणेगाव ग्रामपंचायतच्या वार्ड क्रमांक 3 च्या पोटनिवडणुकीत एकूण मतदान 637 पैकी 552 झाले मतदानाची टक्केवारी 86.66 होती. या चौरंगी लढत मध्ये सारिका रामचंद्र गोसावी,पद्मा मारुती जाधव,उमा तानाजी शिंदे व अंबाबाई पांडुरंग शिंदे हे उमेदवार उभे होते.आपलाच उमेदवार कसा निवडून येईल याकडे कार्यकर्ते मतदारांना आपल्याकडे खेचून घेऊन कोण विजयी होईल हे उद्या समजेल. वेणेगावातही कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले.

You've successfully subscribed to loksahyadri.com
Great! Next, complete checkout for full access to loksahyadri.com
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.