माढा ता.प्रतिनिधी - श्रीकांत मासुळे
टेंभुर्णी परिसर दिवसेंदिवस वाढत आहे टेंभुर्णीच्या परिसरामध्ये आणि विकासामध्ये भर पडत आहे टेंभुर्णी च्या बाहेरून बायपास गेल्यामुळे टेंभुर्णी ची कार्यप्रणाली वाढले आहे. बऱ्याच मोठ्या मोठ्या गाड्यांची वाहतूक बायपासच्या माध्यमातून बाहेरूनच होत आहे. यामुळे सध्या टेंभुर्णी अंतर्गत हायवे वरील रस्ता तसाच धूळ खात राहिला आहे. आणि बायपास मुळे बाहेरच्या लोकांची चांगली सोय झाली आणि बरेच राजकीय नेते पुढारी अधिकारी हे बायपास मार्गेच ये जा करत आहेत म्हणून या लोकांच्या बुडाला दणका बसण्याचा विषयच नाही. टेंभुर्णी कराच्या बुडाला दणका बसला तरी बसू द्या......या हेतूने काम चालू आहे. लक्ष्मी पार्क ते जंजिरा हॉटेल पर्यंत
रस्ता.... हा रस्ताच राहिला नाही. मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. परवाच्या रात्री एक इसम स्वतःच्या बायकोला इंदापूरला हॉस्पिटलला नेण्यासाठी दुचाकीवर टेंभुर्णी मधून निघाला होता. शितल आपारमेंट च्या जवळ त्याला रात्री रस्त्यावरचे खड्डे न दिसल्यामुळे स्वतःच्या गर्भवती बायकोसकट तो रस्त्यावर खाली पडला. गर्भवती महिलाला थोड्याफार जखमा झाल्या पण त्यांनी अगोदर स्वतःच्या पोटाला हात लावून पाहिले. नेमकं तिला समजना स्वतःच बाळ सुरक्षित आहे का असुरक्षित? अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटना टेंभुर्णी अंतर्गत हायवेवर होत आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या सोलापूर विभागाच्या ऑफिसला टेंभुर्णी च्या रस्त्याच्या दुरुस्तीबद्दल विचारणा केली असता हा भाग आमच्याकडे नाही, हा रस्ता आपल्या क्षेत्रामध्ये येत नाही असे उडवाउडवीचे उत्तर काही अधिकारी देत आहेत. मागील काळामध्ये हा रस्ता कोणत्या ठेकेदारांनी बनवला, कोणत्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करून ठेकेदाराला बिल मंजूर कोणी केले , या कामाचे क्वालिटी चेक करणारा हा अधिकारी कोण होता, रस्ता झाल्यापासून रस्त्याची वयोमर्यादा किती ठरवली होती त्याच्या आत रस्ता कसा काय खराब झाला याचा पुरावा टेंभुर्णीची जनता मागत आहे. या कामासाठी किती निधी आला या कामासाठी कुठून आणि कोणकोणते मटरेल कोण कोणत्या काळात किती रुपयाला विकत आणले याची छायांकित प्रती अधिकाऱ्यांच्या सही निशी मागण्यासाठी काही टेंभुर्णी तील संघटना एकत्र येत आहे.