लोक सह्याद्री ई न्युज - मावळ प्रतिनिधी
रोहित चोपडे
कामशेत मावळ दी.१७.
कामशेत येथील एका टायरचे शोरूमचे शटर उघडून चोरट्यांनी शोरूममधून सुमारे पावणे दोन लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे 19 टायर चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 16) सकाळी उघडकीस आली.
प्रवीण पिराजी वारिंगे (वय 27, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वारिंगे यांचे कामशेत येथे एमआरएफ टायरचे शोरूम आहे. बुधवारी (दि. 15) रात्री त्यांनी त्यांचे शोरूम कुलूप लावून बंद केले. रात्रीच्या वेळी अनोळखी चोरट्याने शटरच्या लॉकखालील कट्टा फोडून शटर उघडले. शोरूममध्ये प्रवेश करून एक लाख 72 हजार 624 रुपये किमतीचे नऊ प्रकारचे एकूण 19 टायर चोरून नेले. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. कामशेत पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.