मावळ प्रतिनीधी - रोहित चोपडे
टाकवे बुद्रुक दी.२१: टाकवे गावात सुसज्ज बैलगाडा घाट होण आहे. बैलगाडा शर्यत चालू होताच टाकवे येथील बैलगाडा घाट विकास कामाकरीता कृषी पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषदेचे सभापती बाबुराव वायकर यांच्या वतीने ६ लक्ष रुपयांची निधी मंजूर करण्यात आला आहे.
नुकतीच टाकवे येथील घाटावर प्रत्यक्ष जाऊन बांधक कशा प्रकारे करण्यात येणार आहे, या विषय माहिती बांधकाम विभागाच्या अधिकारी अंजली कडवडे यांनी पाहणी करुन दिली. यावेळी उपस्थितीत ग्रामपंचायत पदाधिकारी, बैलगाडा शौकीनांनी घाट बांधकामा संदर्भात काही सुचना केल्या.
यावेळी पुणे जिल्हा बैलगाडा विमा संघटना मा. अध्यक्ष नंदु असवले, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष बाबाजी गायकवाड, सरपंच भुषण असवले, उपसरपंच परशुराम मालपोटे, मा. सदस्य नवनाथ आंबेकर, शिवाजी जांभुळकर, •अर्जुन गुणाट, अक्षय असवले, संतोष लोढे, समिर असवले, सोमनाथ असवले, संतोष आंबेकर, सोमनाथ जगताप, चंद्रकांत जगताप, बैलगाडा शौकीन उपस्थितीत होते.
बैलगाडा घाट विकास बांधकामासाठी तात्काळ निधी मंजूर करुन दिल्याबद्दल टाकवेतील सर्व बैलगाडा मालकांनी सभापती बाबुराव वायकर यांचे आभार मानले.