पंढरपूर प्रतिनिधी -: ‘चालू शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी सध्या राज्यामध्ये पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया (कॅप) सुरू असून स्वेरी अभियांत्रिकीमध्ये सुरु असलेल्या या प्रवेश प्रक्रियेस विद्यार्थ्यांचा नेहमीप्रमाणे प्रचंड प्रतिसाद आहे. कोरोना काळात नाविन्यपूर्ण बदल घडवत गुणवत्ता टिकवून विद्यार्थ्यांसाठी भरभरून संधी निर्माण करण्यासाठी स्वेरी कोणत्याही बदलास खंबीरपणे सामोरे जाण्यास नेहमीच सज्ज असते. नुकत्याच झालेल्या प्रवेश प्रक्रियेत डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि डी.फार्मसीची दोन महाविद्यालये अशी स्वेरी अंतर्गत तिन्ही महाविद्यालये १०० टक्के प्रवेश क्षमतेने भरली असून हा पालक आणि विद्यार्थी यांनी स्वेरीवर दाखविलेला दृढ विश्वास आहे.’ असे प्रतिपादन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी केले.
कोविड काळातही चालू वर्षी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेल मधून विद्यार्थ्यांना मिळालेल्या नोकरीच्या विक्रमी संधी, प्लेसमेंटसाठी महाविद्यालयात येणाऱ्या कंपन्यांची वाढलेली संख्या, विद्यार्थ्यांना मिळणारे सरासरी व सर्वोच्च पॅकेज, विद्यापीठाच्या शैक्षणिक निकालात स्वेरीचे अव्वल स्थान, ऑनलाईन शिक्षणासाठी केलेले अभिनव प्रयोग, सुमारे दहा हजार पेक्षा जास्त तास घेतलेली ऑनलाईन लेक्चर्स, विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्य वाढीसाठी व सर्वांगीण विकासासाठी घेतलेले अॅडवान्स्ड टेक्निकल व सॅाफ्ट स्कील ट्रेनिंग, विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी आयोजित केलेले ऑनलाईन प्लेसमेंट ड्राईव्ज, विविध संशोधन प्रकल्पांमधून आतापर्यंत मिळालेला सुमारे ९ कोटी इतका निधी, कोरोनाच्या या काळात विविध सहा प्रकल्पांमधून मिळालेला सुमारे सव्वा कोटी इतका संशोधन निधी, एन.पी.सी.आय.एल. कडून मिळालेला सुमारे २ कोटी रुपयांचा निधी, उद्योजकता विकासासाठी बेंगलोरच्या सोबस या संस्थेसोबत केलेला करार व त्यातून स्वेरीमध्ये स्थापन करण्यात आलेले उद्योजकता विकास केंद्र व त्यातून आयोजित केले जाणारे विविध उपक्रम, स्वेरीचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) कडून मिळालेला देश पातळीवरील प्रथम क्रमांकाचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’, स्वेरीतील उच्चशिक्षित व पीएच.डी. धारक प्राध्यापक, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत झालेले सामंजस्य करार या व अशा विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांच्या हिताचे कार्य स्वेरीतून घडत आहे हे स्पष्ट होते.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे सरांनी १९९८ साली पंढरपुर परिसरातील मुलामुलींच्या तंत्रशिक्षणाची सोय व्हावी म्हणून अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले. आजतागायत डॉ. रोंगे सरांच्या माध्यमातून आणि त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली स्वेरीची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. तंत्रशिक्षणातील विविध प्रकल्प, संशोधन, पंढरपूर पॅटर्न हे व असे विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक उपक्रम राबविले जात आहेत, हे सर्वश्रुत आहे. या परिश्रमाचे फलित म्हणजेच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दरवर्षी होणारी वाढ, प्रथम वर्षाच्या वार्षिक निकालात विद्यापीठात असणारी आघाडी आणि सर्वात विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडविण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यात तसेच प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही सोलापूर जिल्ह्यात टॉप वर आहे. उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, त्यांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन, अद्ययावत सुविधा, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची विशेष सोय, परिसरातील स्वच्छता, कमवा व शिका योजना या सर्व बाबींमुळे स्वेरीचे शैक्षणिक क्षेत्रातील स्थान अढळ आहे.
छायाचित्र- स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालय इमारत व इन्सेट मध्ये स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरी लोगो.