दि.१०/११/२०२१
पंढरपूर (संतोष हलकुडे) - सोलापुरातील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग व छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, तसेच पंढरपुरच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये न्यू इंडिया ७५ जनजागृती कॅम्पेन तर्फे रेड रिबन क्लब अंतर्गत महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी एचआयव्ही/ एड्स या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा -२०२१ चे आयोजन केले होते. या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत स्वेरीतील विद्यार्थ्यांनी दुसरा क्रमांक मिळविला आहे.
स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये नवी दिल्लीच्या राष्ट्रीय एड्स नियंत्रण (नॅको) यांनी मंजूर केलेल्या सन २०२१-२२ वार्षिक कृती आराखड्यानुसार एचआयव्ही /एड्स, क्षयरोग, गुप्तरोग, रक्तदान इत्यादी आरोग्य विषयक प्रश्नावर रेड रिबन क्लब अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. दीप प्रज्वलनानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी प्रास्तविकात एड्स प्रतिबंध व नियंत्रणाची जनजागृतीची करणे का आवश्यक आहे ? हे सविस्तर सांगितले. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण, सोलापूरचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी यांनी एड्स विषयाची माहिती देवून संभाव्य धोका ओळखून जागृत राहण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले.

या स्पर्धेमध्ये मंगळवेढ्याच्या श्री. संत दामाजी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक तर पंढरपूरच्या स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजने दुसरा क्रमांक तर पंढरपूरच्याच उमा महाविद्यालयाने तिसरा क्रमांक पटकावला. या प्रश्नमंजूषा कार्यक्रमामध्ये पंढरपुरचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, मोहोळच्या देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय व अनगर मधील शंकरराव बाजीराव पाटील महाविद्यालय यांनीही सहभाग घेतला होता. विजेत्यांना अनुक्रमे पाच हजार रुपये, दोन हजार रुपये व एक हजार रुपये अशी रोख रक्कम व प्रमाणपत्रे तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. या उपक्रमात एकूण सहा महाविद्यालयातील जवळपास तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून अक्षय माने, अर्पिता लाड, इरफान मुलाणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रेड रिबन क्लब प्रश्नमंजुषा स्पर्धा-२०२१ ही श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले व उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी जिल्हा परिवेक्षक कृष्णा सकट, योगीनाथ विजापुरे, श्रीमती सुनाबी शेख, दिलीप गोरे, नागेश देवकर, एजाज बागवान, गणराज दरेकर, आबासाहेब नागणे तसेच प्रा. कुबेर ढोपे, प्रा. माने प्रा. गायकवाड, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. सोमनाथ ठिगळे, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, स्वेरीचे एन.एस.एस अधिकारी डॉ. महेश मठपती, प्रा. सुभाष जाधव आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपजिल्हा रुग्णालयाचे पुरुषोत्तम कदम व स्वेरीचे प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर बाजीराव नामदे यांनी आभार मानले.

छायाचित्र- स्वेरीमध्ये ‘रेड रिबन क्लब’ अंतर्गत युवक-युवतींसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते त्याच्या उदघाटन प्रसंगी डॉ. सयाजीराव गायकवाड ,कृष्णा सकट, योगीनाथ विजापुरे, श्रीमती सुनाबी शेख, दिलीप गोरे, नागेश देवकर, एजाज बागवान, गणराज दरेकर, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. सोमनाथ ठिगळे आदी.