नातेपुते प्रतिनिधी- (प्रमोद शिंदे)
कुरबावी ता.माळशिरस जि.सोलापूर येथे स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवानिमित्ताने नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव गिते यांनी टेनिस बॉल वरील क्रिकेटचे सामने आयोजित करून सर्व जेष्ठ खेळाडूंचा सन्मान केला.सकाळच्या सत्रात सामन्यांचे उद्घाटन आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाइंजे, जेष्ठ क्रिकेटर डी.जी. रणवरे,गजानन पाटील,आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक संघटनेचे राज्य अध्यक्ष लाखन चव्हाण,शाहरुख माणेर यांच्या शुभहस्ते नारळ फोडून पूजा करून सामन्यांना प्रत्यक्ष सुरवात झाली.

एकूण आठ संघांनी भाग घेतला.यामध्ये डोंबाळवाडी,तांबेवाडी, चंद्रपुरी,धर्मपुरी,दहिगाव,नातेपुते,बारामती,फलटण,सांगोला,इंदापूर,पंढरपूर,येथून खेळाडू आले होते.अंतिम लढत श्रीराम क्रिकेट क्लब शिंदेवाडी व अमृतमहोत्सव क्रिकेट क्लब एकशिव,कुरबावी या संघात झाली.शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक,श्वास रोखून धरायला लावलेल्या अटीतटीच्या लढतीत अमृतमहोत्सवी टीमने बाजी मारून मनाचा चषक पटकावला.
तर उपविजेत्या शिंदेवाडीच्या टीमने लौकिकाला साजेल असा खेळ दाखवून खिलाडीवृत्तीचे अभूतपूर्व दर्शन घडवुन तरुणांच्यापुढे नवीन आदर्श निर्माण केला.संध्याकाळी समारोपात शिंदेवाडीचे नवाज शेख सर,जेष्ठ क्रिकेटर डी.जि.रनवरे,चंद्रपुरीचे बापू जाधव,डोंबळवाडी चे आप्पासाहेब रुपणवर,एकशिवचे रजाक आतार सर,राहुल कसबे सर,ऍड.अमोल सोनवणे,सांगोल्याचे पंकज काटे,राष्ट्रीय समाज पक्षाचे आण्णासो रुपणवर पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मामासाहेब पांढरे,भारतमुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य काकासाहेब जाधव,माळशिरसचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे यांनी मार्गदर्शन केले.अनेक वर्ष एकमेकांविरुद्ध क्रिकेट खेळलेले खेळाडू एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.सर्वांच्या चेहऱ्यावर एकप्रकारे हास्य उमलले होते.सर्वजण अक्षरशः गळ्यात पडून आदराने एकमेकांची चौकशी करत होते नव्यादमाचे तरुण खेळाडू जुन्या जेष्ठ खेळाडूंमधील क्रिकेट व ऊर्जा क्रिकेटबद्दलची आत्मीयता पाहून चाट झाले होते.वैभव गिते यांनी सर्व जुन्या व जेष्ठ एकेकाळी मैदान गाजवून स्वतःच्या गावाचा नावलौकिक वाढवलेल्या खेळाडूंचा सन्मान केला.शिंदेवडीचे जेष्ठ खेळाडू डी.जी. रनवरे यांनी 53 व्या वयात खेळताना षटकार खेचत प्रेक्षकांची मने जिंकली.क्रिकेटच्या सामन्यांचे धावते वर्णन (कॉमेंट्री) राजेंद्र खंडागळे,रजाक आतार सर,नवाज शेख सर,वैभव गिते यांनी करून अनेक आठवणींना उजाळा दिला.तर शरद रुपणवर सर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.असे मैत्रीपूर्ण कार्यक्रम प्रत्येक वर्षी घेण्यात यावेत अशी मागणी जनतेकडून होत आहे.
