latest

स्त्रीरोगतज्ज्ञविना सुरू आहे यवत ग्रामीण रुग्णालय!गर्भवती महिलांची होतेय हेळसांड

सिजेरिंग साठी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर नेमणूक करण्यात यावी;दौंड तालुका समता परिषद यांची मागणी

यवत-प्रतिनिधी‌‌

ग्रामीण शासकीय रुग्णालय येथे महिन्यातून साधारण 25 ते 30 पेक्षा जास्त गर्भवती महिलांची प्रसूती होते.त्यातील अनेक महिलांची शस्त्रक्रिया करावी लागते.परंतु यवत ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे येथील गर्भवती महिलांना सिजेरिंग प्रसूतीसाठी मात्र परिसरातील खासगी दवाखान्यात किंवा वेळ प्रसंगी पुण्याला जावे लागत आहे.या रुग्णालयात यवत परिसरातील खेडेगावांतून महिला रुग्ण येतात.या रुग्णांची आरोग्याची तपासणी रुग्णालयात होते खरी;पण प्रसूतीची वेळ आल्यानंतर त्या महिलांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात किंवा पुण्यात रवाना करण्यात येते.अगदी शेवटच्या वेळी रुग्णांना पन्नास-साठ किलोमीटर लांब जाणे त्यांच्या जिवावर बेतते.कित्येक वेळा तर प्रसूतीच्या रुग्णांना त्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाल्याने अनेक महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेतच किंवा रुग्णालयाच्या दारातच प्रसूती झाल्याच्या घटनाही यापूर्वी घडलेल्या आहेत.त्यामुळे गर्भवती महिलांची होणारी हेळसांड आणि गरज ओळखून 'दौंड तालुका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांनी तत्काळ यवत ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक शशिकांत इरवाडकर यांना लेखी निवेदन देऊन सिजेरिंग साठी गायनेकलाँजी तज्ञ डॉक्टर नेमणूक करण्यात यावी अशी स्तुत्य मागणी केली आहे.रुग्णालयात गायनेकलाँजी तज्ञ डॉक्टर नसल्याने परिचारिका यांनाच गर्भवती महिलांची तपासणी करावी लागत आहे.लाखो रुपये खर्च करून येथे प्रसूतिगृह बांधण्यात आले आहे.‌‌मात्र स्त्रीरोगतज्ज्ञाअभावी हे रिकामे आहे.सिजेरिंग करण्यासाठी एमबीबीएस व डीजीओ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असते.राज्य सरकार,केंद्र सरकार,आणि जिल्हा परिषद,‌‌स्व उत्पन्नातून दरवर्षी सरकारी आरोग्य सेवेवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करते.मात्र त्याचा लाभ गरजवंतांना मिळनार नसेल,वेळेवर रुग्णांना आरोग्य सुविधा मिळणार नसतील तर त्याचा उपयोग काय?ग्रामीण भागातील लोकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांंनी नियुक्तीच्या ठिकाणी राहणे तितकेच आवश्यक आहे.जिल्हा सरकारी रुग्णालयापासून खेडेगावापर्यंत जागोजागी सरकारी आरोग्य यंत्रणेचे जाळे निर्माण करण्यात आलेले आहे. मात्र हे जाळे कधीच विरले असून सर्वसामान्यांना आरोग्य सेवेसाठी खासगी ठिकाणी उंबरे झिजवण्याची वेळ आली आहे.अशा ठिकाणी रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे.त्यामुळे यवत ग्रामीण रुग्णालयात सिजरिंग साठी गायनेकोलाँजी तज्ञ डॉक्टर नेमण्यात यावेत‌‌गोरगरीब रुग्णांची सोय व्हावी‌‌या स्तुत्य मागणीसाठी दौंड तालुका अखिल भारतीय समता परिषद कार्याध्यक्ष मंगेश रायकर,उमेश म्हेत्रे,‌‌भरत भुजबळ,मोहीन तांबोळी,दत्ता डाडर,‌‌संजय अडागळे उत्तम गायकवाड,काळुराम शेंडगे इत्यादी अनेक कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण रुग्णालय यवत येथे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमार्फत रुग्णांना परिपूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न आहे.स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टराची गरज आहे.मात्र ते नसल्याने काम बंद झालेले नाही.काही दिवसांत स्त्रीरोगतज्ज्ञाची नेमणूक करण्यात येईल.‌‌शशिकांत इरवाडकर ग्रामीण रुग्णालय यवत अधीक्षक

You've successfully subscribed to loksahyadri.com
Great! Next, complete checkout for full access to loksahyadri.com
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.