अक्कलकोट ( प्रतिनिधी )
दिनांक 11 एप्रिल २०२२ रोजी गोगांव च्या सरपंच सौ वनिता ताई मधुकर सुरवसे यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांची कागल येथील त्यांच्या स्वगृही भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.सरपंच परिषदेकडून प्रतिनिधी म्हणून सौ वनिता सुरवसे यांनी ग्रामविकास मंत्र्यांच्या घरी जाऊन केक, पुष्पगुच्छ,शाल फेटा देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान वीस मिनिट अक्कलकोट तालुक्यातील विकास कामाबद्दल चर्चा झाली, सरपंच सौ वनिताताई सुरवसे यांनी ग्राम विकास मंत्र्यांसमोर सर्व अडचणी मांडल्या, त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेसाठी अक्कलकोट तालुक्याला अध्यक्षच नाही अध्यक्षाची नेमणूक तात्काळ करावी,अक्कलकोट तालुक्यामध्ये सर्रास वृक्षतोड होत आहे त्याबद्दल संबंधित खात्याला आदेश द्यावे व ज्यांनी वृक्षतोड केली आहे त्यांना शिक्षा मिळावी, व सोलापूर जिल्ह्यातील सर्व सरपंचासाठी सरपंच भवन करून मिळावे यासाठी ही विनंती केली.
तसेच गोगावसाठी विविध प्रकारे निधीची मागणी केली व साहेबांनी गोगावसाठी तात्काळ पत्रावर इंडोसमेंट मारून निधी देण्याची तरतूद केली, तुम्ही एक महिला सरपंच असून आज साडेतीनशे किलोमीटर लांब येऊन तुमच्या संबंधित गावा बद्दलच्या सर्व अडचणी मांडलात त्यामुळे तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. माझेआशीर्वाद व माझ्या शुभेच्छा तुमच्या सारख्या सरपंचांच्या कायम पाठीशी असतील. आणि आपण सव्वा वर्षात केलेल्या कार्याचा आढावा बघितल्यावर आपल्या गावाचे भविष्य उज्वल असेल असे म्हणून सौ सरपंच वनिता सुरवसे यांच्या डोक्यावर हात ठेवून सरपंचांना आशीर्वाद दिला. तसेच तुम्हाला येत्या काळात माझ्याकडून संपूर्ण सहकार्य मिळेल तुमच्या सारखा पाठपुरावा करणारे सर्व सरपंच केले तर सर्व गाव सुजलाम-सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही, असे ग्रामविकास मंत्री म्हणाले.. येत्या काळात आपल्या लिहिलेल्या पत्राची दखल घेऊन टप्प्याटप्प्याने सर्व मागण्या मी पूर्ण करेल अशा आश्वासनही सौ वनिता सुरवसे यांना ग्रामविकास मंत्र्यांनी दिले. ग्रामविकास मंत्रीसाहेब आपणास उदंड आयुष्य मिळो व आपल्या कडून महाराष्ट्राच्या सर्व ग्रामपंचायतीचा विकास होवो,हीच आमचे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना अशा शुभेच्छा सरपंच परिषदेच्या जिल्हा समन्वयक वनिताताई मधुकर सुरवसे यांनी दिल्या.
यावेळी कोल्हापूरचे माजी महापौर परीक्षित पन्हाळकर साहेब , उद्योगपती सुधाकर सुरवसे, सरपंच सौ वनिता सुरवसे यांचे पती श्री मधुकर सुरवसे हे उपस्थित होते ..