दै.लोक सह्याद्रि प्रतिनीधी- मावळ तालुका
रोहित चोपडे
वडगाव मावळ दी.२६: नियमित व वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने जाहीर केलेली, ५० हजारांची
प्रोत्साहनपर मदत त्वरित मिळावी. अन्यथा गुरुवारी (दि. २० जानेवारी २०२२) रोजी मावळ तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्यात येईल. असा इशारा मावळ
भाजपा किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे.तसे निवेदन महाराष्ट्र प्रदेश भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस संतोष दाभाडे मावळ तालुका अध्यक्ष सुभाष धामणकर व अन्य पदाधिकारी यांनी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे दिले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार सुनील शेळके, अध्यक्ष पुणे जिल्हा सहकारी बँक, पोलिस निरिक्षक वडगाव मावळ व तळेगाव दाभाडे यांना देण्यात आल्या आहेत. मावळ भाजपा किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे जिल्हा मध्यवती सहकारी बँकेअंतर्गत विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून मावळ तालुका व पुणे जिल्यातील शेतकऱ्यांनी सन २०१९ मध्ये घेतलेल्या पिक कर्जाची परतफेड मार्च २०२० मध्ये बँकेच्या / संस्थेच्या नियमानुसार केली.
नियमित व वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये प्रोत्साहनपर मदत सरकारने देण्याचे जाहिर केले होते. परंतू अद्यापही सरकारने जाहिर केलेली मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गा मध्ये संताप व नाराजी असून त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.
सदर विषयाबाबत (दि. ८.२.२०२१), (दि. १५.०३.२०२१), (दि. २३. ८. २०२१) रोजी निवेदन देवून देखील अद्यापही सरकारने शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर जाहीर केलेली प्रोत्साहनपर मदत जमा केलेली नाही. त्यामुळे कर्जाची परतफेड नियमित व वेळेवर करून चुक तर केली नाही ना ? कर्जाची परतफेड करावी का नाही ? अशी संभ्रमावस्थाच द्विधा मनस्थिती शेतकरी वर्गामध्ये निर्माण झालेली आहे.त्याचा विविध कार्यकारी सोसायटीच्या कर्ज वसुलीच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विविध कार्यकारी सोसायटीच्या कर्जाची परतफेड नियमित व वेळेत व्हावी. सोसायटीच्या वसूलीच्या टक्केवारीमध्ये चांगल्या प्रकारे वाढ व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी अडचणीच्या काळात देखिल सोसायटीच्या कर्जाची परतफेड केली.परंतू सरकारने जाहीर केलेली ५० हजार रुपये मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेली नसल्यामुळे वेळेवर कर्जाची परतफेड करणारे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे. त्यामुळे या निवेदनाद्वारे, नियमित व वेळेवर कजांची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने जाहिर केल्याप्रमाणे ५० हजार रुपये प्रोत्साहनपर मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करण्यासंदर्भात शासन स्तरावर योग्य ते आदेश व आवश्यक प्रशासकिय कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना दिलास व न्याय द्यावा असे निवेदनात म्हटले आहे.
सरकारने जाहिर केलेली प्रोत्साहनपर मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर त्वरीत जमा करावी अन्यथा सदर विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी व पदाधिकारी यांच्या वतीने गुरुवार (दि. २०) जानेवारी रोजी तमिलटार कार्यालय वडगाव मावळ याठिकाणी एक मधे वाचा उपोषण” आंदोलन करण्यात येईल व त्यानंतर होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी सरकारची राहील असे निवेदनाद्वारे सांगण्यात आले.