दैनिक लोक सह्याद्री ई न्युज
मावळ प्रतिनीधी
रोहित चोपडे
शिरगाव दी.२१:'साहब आपके कॉलर पर किडा है' असे म्हणत कामगाराने मालकाची ४५ हजारांची सोनसाखळी चोरून नेली. हि घटना शुक्रवारी (दि. १७) रात्री बेबडओहोळ गावच्या हद्दीत आढले रोडवर कामगाराला सोडण्यासाठी दुचाकीवरून जात असताना हि घटना घडली.
राहुल शंकरराव ढमाले (वय ४२, रा. बेबडओहोळ, ता. मावळ) यांनी याप्रकरणी शिरगाव चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार कामगार शिवशंकर (रा. उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे इंजिनिअरिंग वर्कशॉप आहे. त्यात आरोपी शिवशंकर काम करतो. शुक्रवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास त्याला घरी सोडण्यासाठी फिर्यादी त्यांच्या दुचाकीवरून जात होते. बेबडओहोळ येथे आढले रोडवर आरोपीने 'साहब आपके कॉलर पर किडा है' असे म्हणून फिर्यादी यांच्या मानेवर, गळ्याला हात लावला. त्यावेळी त्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीची दोन तोळे सोन्याची चेन हिसका मारून तोडली आणि पळून गेला. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.