latest

चव्हाणवाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा


टेंभुर्णी प्रतिनिधी:-  नवनाथ नांगरे

चव्हाणवाडी ,तालुका माढा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन कोरोणाचे सर्व नियम पाळून संपन्न झाला.
सरपंच सुनिल मिस्किन यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली .प्रास्ताविकामध्ये अॅडव्होकेट महेश खरात यांनी आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.यानंतर नवनाथ नांगरे सर यांनी आपले विचार व्यक्त करताना ,डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महामानव असून संपूर्ण जगभरामध्ये त्यांच्या विशेष मानवतावादी कार्यामुळे ते परिचित आहेत.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित वंचित समाजाबरोबरच संपूर्ण बहुजनांसाठी मोलाचे असे कार्य केले असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.त्यानंतर अॅडव्होकेट सचिन चव्हाण यांनी आपल्या भाषणामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या वंचित व शोषित समाजाच्या कार्याबरोबरच  त्यांच्या इतर पैलूवर प्रकाश टाकताना,डॉ बाबासाहेबांचे आर्थिक, शेतकरीविषयक, पाणीविषयक, महिलाविषयक, धोरण,भारत देशाच्या विकासमध्ये  किती महत्त्वाचे योगदान आहे यावेळी स्पष्ट केले.
यावेळी माजी सरपंच संजय मिस्कीन यांनी आपलेविचार व्यक्त करताना,आज डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या समान न्याय व समान संधी या तत्त्वावर सामान्य माणूस सुद्धा उच्च पदापर्यंत जाऊ शकतो हे स्पष्ट केले.
यावेळी सरपंच सुनिल मिस्कीन उपसरपंच बाळासाहेब मोठे अर्जुन सलगर हनुमंत चव्हाण अशोक मिस्कीन अरुण चव्हाण अड. सचिन चव्हाण संजय मिस्कीन नवनाथ नांगरे सर, अॅड.महेश खरात,नागनाथ चव्हाण कैलास चव्हाण साहेब,पत्रकार हनुमंत तावरे , बापू सलगर लालासाो कांबळे आदी मान्यवर  व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हनुमंत तावरे प्रास्ताविक अॅड महेश खरात तर आभार नवनाथ नांगरे सर यांनी मानले.

You've successfully subscribed to loksahyadri.com
Great! Next, complete checkout for full access to loksahyadri.com
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.