रावणगाव प्रतिनिधी : परशुराम निखळे
दौंड तालुक्यातील रावणगाव नंदादेवी खडकी कुरकुंभ परिसरात मटका दारू अन्य अवैद्य धंद्यांचा पुन्हा एकदा सुळसुळाट झाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. सर्रासपणे अवैध धंदेवाले यांनी अक्षरशः कहर केला असून सर्रास अवैध धंदे चालू असल्याने या भागात अवैध धंदेवाले यांनी आपली मटका, दारू, यांची दुकाने थाटली आहेत. रावणगाव खडकी बोरीबेल नंदादेवी कुरकुंभ ग्रामपंचायत हद्दीत अजूनही मटका, हातभट्टी यांची बेकायदेशीर पणे आपली दुकाने थाटली आहेत.अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत.यावेळी कुरकुंभ रावणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी अवैध धंदे खुलेआम चालू असल्याने दौंड, रावणगाव पोलिसांचे काम संशयास्पद आहे, दरम्यान बेकायदेशीर धंदेवाल्यावर ना कोणाचा धाक आहे ना दरारा, पोलिस खात्याला हे अवैध धंदेवाले जुमानतसुद्धा नाहीत, कोण पोलिस आमचे कोणीसुद्धा काही करू शकत नाही असे म्हणण्यापर्यंत त्यांनी आता मजल मारली आहे. हे धंदे करणाऱ्या लोकांना तालुक्यातील काही प्रतिष्ठित लोकांना जवळ करून आपला धंदा जोमात थाटला आहे की काय असा सवाल येथील नागरिक करीत आहे. पोलिस प्रशासनाने वेळीच यांना लगाम नाही घातल्यास याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात जनतेस आणि पोलिस प्रशासन यांना सहन करावे लागणार आहेत. या बेकायदा दारू, मटका, हातभट्टी,या सर्व प्रकारच्या अवैध धंदे या भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या भागातील पोलिस अधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसले असून त्यांचा या भागात कसल्याच प्रकारचा धाक नसल्याने अवैध धंदेवाल्यांनी आपले धंदे बेकायदेशीरपणे चालू ठेवले असल्याचे नागरिक बोलत आहे. अवैध धंदे जोमात असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नीचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाने यांना वेळीच धडा शिकवणे गरजेचे आहे, तसेच बेकायदेशीर मटका,दारू लोकवस्ती व बाजार पेठेलगत असल्याने महिला वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, या सर्व अवैद्य धंदे लवकरात लवकर बंद करण्यात यावेत आणि अवैध धंदे करणारे मालक व कामगारांनावर कडक कारवाई करून यांना लवकरात लवकर जिल्हामधुन तडीपार करण्यात यावे अशी मागणी महिला आणि नागरीक करत आहेत खडकी येथील तर अवैद्य धंदे तर खुले आम केले जातात स्वतः खडकी येथील आदर्श महिला सरपंच यांच्या वार्ड मध्येच तर बरेच गैरकानूनी धंदे चालू आहेत पाहुन न पहिल्या सारखे केले जाते अशी चर्चा खडकी येथील नागरिकानमध्ये जोरदार चालू आहे
रावणगाव खडकी एथील सरास हाॅटेल वरती विना परवाना देशी विदेशी दारू विकली जात आहे मग ही दारू एतीय कुठुन हे देखील समजत नाही मळद रावणगाव खडकी एथील रीतसर शासनानी दिलेला परवाना हाॅटेल आक्षरष मोकळी दिसत आसता आणि विना परवाना हाॅटेल वाले मात्र खुले आम कमी कीम॔तीत खुले आम दारू विकत तरी देखील पोलीसाची बघ्याची भूमीका दिसत आहे हि विना परवाना दारू विकत आसलेले हाॅटेल बंद केली नाहीत तर ज्या हाॅटेलला रीतसर परवाने शासनाने दिलेले आहेत हे चाललेच नाही तर ते टॅक्स कसे भरनार ही हाॅटेल मालक चालक यांचात जोरदार चालू आहे