दौंड रावणगाव परशुराम निखळे
रावणगाव येथेल इरिकेशन काॅलनी येथे दत्त जन्म सोहळा शनिवार (ता.१८ ) मोठ्या उत्साहात पार पडला.रावणगाव ग्रामस्थांच्या वतीने दत्त मंदीर परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्या त आले होते.त्यानिमित्ताने शनिवार सकाळी संभाजी महाराज काळे ९ ते १२ या वेळेत यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम रावणगाव ग्रामस्थांच्या वतीने ठेवण्यात आला होता.

शनिवारी सकाळी अभिषेक आणि आरतीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सकाळी ९ ते १२ वेळेत संभाजी काळे महाराज यांचे कीर्तन आणि प्रवचनाचा कार्यक्रम होऊन दुपारी १२ वाजता दत्त जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी दौड पंचायत समिति माजी उप सभापती उत्तम आपा आटोळे रावणगाव वि का सोसायटी चेरमण तुकाराम राधवण दिलीप आटोळे विजयकुमार आटोळे मंडळाचे व्यवस्थापक मंडळी अजिक्य कांबळे रोहित आटोळे लक्ष्मिण भोपाळ रंजित भोपाळ अदित्य निखळे अक्षय आटोळे महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन श्री दत्त जन्म सोहळ्याची सांगता झाली.