बेंबळे प्रतिनिधी - दत्तात्रय सुरवसे
माढा तालुक्यातील मिटकलवाडी येथे शासन आदेशानुसार व्यवस्थापन समितीची स्थापना झाली. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शिवाजी मिस्कीन तर उपाध्यक्षपदी महावीर सलगर यांची बिनविरोध निवड झाली. शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कोरे यांनी समिती निवडण्यासाठी पालकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सदर निवडी करण्यात आल्या.
यावेळी अण्णासो राजगिरे, वर्षा मिटकल, कामिनी दळवी, राजेंद्र देवकर, स्वाती वायकर, कैलास भारती, नंदा सुरवसे, संगिता कोळी,शितल श्रीखंडे, धनाजी ठेंगल, वंदना सुरवसे ग्रामपंचायत सदस्या, बाळासाहेब मिटकल विद्यार्थी पालक प्रतिनिधी, नागनाथ लोकरे शिक्षणप्रेमी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदरप्रसंगी सरपंच अनिता मिटकल, उपसरपंच रविंद्र श्रीखंडे, शहाजी मिस्कीन, सतिश मिस्कीन, लालासो मिटकल, संतोष सुरवसे, शंकर मिटकल, विनोद मिटकल, सतिश मिटकल, पत्रकार दत्तात्रय सुरवसे आदींसह शिक्षक किशोर क्षीरसागर
अरविंद मंडरे, शिक्षिका नंदा पिसाळ,भाग्यश्री काकडे आदींसह पालक उपस्थित होते. उपस्थितांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचे अभिनंदन केले.
