latest

मिटकलवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी अर्चना श्रीखंडे बिनविरोध ....

दत्तात्रय सुरवसे‌‌ बेंबळे प्रतिनिधी:-

मिटकलवाडी ग्रामपंचायतीवर जय हनुमान ग्रामविकास आघाडीने ७ पैकी ७ जागा जिंकून एकहाती सत्ता स्थापन केली आहे. सात सदस्यांमध्ये रविंद्र श्रीखंडे यांनी प्रभाग क्रमांक १ व ३ या दोन प्रभागांमधून विजयी झाले होते, रविंद्र श्रीखंडे यांनी प्रभाग क्रमांक १ मधील सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे सदर रिक्त जागेसाठी पोट निवडणूक जाहीर झाली होती. या जागेसाठी सौ. अर्चना रविंद्र श्रीखंडे यांचा एकमेव उमेदवारी दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी जी के सोनवणे व नवनाथ दोंड यांनी सौ. अर्चना श्रीखंडे यांना बिनविरोध सदस्य घोषीत केले.मिटकलवाडी ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात एकाच वेळी पती-पत्नी ने ग्रामपंचायत सदस्यत्व भूषविण्याची पहीलीच वेळ आहे. दरम्यान निवडणूक बिनविरोध केल्यामुळे सौ. अर्चना श्रीखंडे यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. अर्चना श्रीखंडे यांची मिटकलवाडी ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्यामुळे आ. बबनराव शिंदे, जि. प सदस्य रणजितसिंह शिंदे, पंचायत समिती सभापती विक्रमसिंह शिंदे, पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे यांनी श्रीखंडे यांचे अभिनंदन केले.

You've successfully subscribed to loksahyadri.com
Great! Next, complete checkout for full access to loksahyadri.com
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.