latest

"महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त" च्या नावाखाली बोगस टेस्ट सिरीज घेणाऱ्या व्यक्तीकडून आणि त्यांच्या खाजगी एजंट कडून विद्यार्थी व पालकांची लूट, अश्या बोगस लोकांवर कारवाई कधी होनार?

माढा ता‌.प्रतिनीधी -‌ श्रीकांत मासुळे

पुस्तकांवर "महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त" हे विधान लिहून आणि धर्मादाय आयुक्तांकडून  रजिस्टर केलेली संस्था चे registration नंबर दाखवून आमची संस्था सरकारमान्य आहे तुम्ही एडमिशन घ्या,असे सांगून विद्यार्थ्यांना व पालकांना आकर्षित करून घेत आहेत.पुणे व सोलापूर मध्ये काही बोगस संस्थाचालक आणि त्यांच्या खाजगी एजंटकडून टेस्ट सीरिजच्या नावाखाली स्वतःची बोगस संस्था चालवत आहे. हे बोगस शिक्षक माढा तालुका, इंदापूर तालुका ,करमाळा तालुका, पंढरपूर तालुका, माळशिरस, बारामती, अशा भागात स्वतःच्या मर्जीनुसार विद्यार्थ्याकडून मनमर्जी फी घेऊन विद्यार्थ्यांची फसवणुक करतात. धर्मदाय आयुक्त कडे एकाच नावाने दोन संस्था रजिस्ट्रेशन? असुन या संस्थेच्या नावाखाली स्पर्धा परीक्षा "एकाच नावाने दोन व्यक्ती संस्था चालवत असताना विद्यार्थी आणि पालकांना फसवत आहेत. यामुळे संतप्त पालक एकत्र येऊन संस्थे विरुद्ध कायदेशीर तक्रार करनार आहेत. दोन्ही संस्थांपैकी एक कुणाची तर संस्था बोगस आहे याची चौकशी शिक्षणाधिकाऱ्यांनी करावी अशी विद्यार्थी व पालकांची मत आहे. ऑफिसच्या पत्त्यावर काही नागरिक गेले असता तिथे ऑफिस नसल्याचे त्यांना समजले. ऑफिस चे पत्ते चुकीचे टाकले आहेत,  त्यावर काही पालक आणि शिक्षक एकत्र येऊन अशा बोगस संस्थाचालकांवर कारवाई करण्यासाठी कधीही तयार आहेत असे सांगण्यात येत आहे. तसेच हे संस्थाचालक खाजगी एजंटांना खूप मोठ्या प्रमाणात पैशांची लालच देऊन त्यांच्याकडून ऍडमिशन मिळवण्याचं काम करत आहेत. एवढी भरमसाठ रक्कम गोळा करून विद्यार्थ्यांना मात्र निराशाच हातात भेटती. म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी बोगस संस्थाचालकांवर, संस्थेची कागदापत्री तपासणी, तसेच कोणत्या विद्यापीठांनी त्यांना परवानगी दिली आहे का नाही, संस्थेचे ऑडिट याची तपासणी करून कायदेशीर कारवाई करावी.काही बोगस शिक्षक बरेच दिवस स्वतःचे आडनाव बदलून विद्यार्थ्यांचे ॲडमिशन करून काही विद्यार्थ्यांची व पालकांची फसवणूक केली आहे.त्या शाळेतल्या शिक्षकांना पैसे देऊन विद्यार्थ्यांचा डाटा मिळवून विद्यार्थ्यांना एडमिशन साठी तयार करतात. अश्या बोगस टेस्ट सिरीज घेणाऱ्या बोगस संस्थाचालकांवर,त्यांना काही पैश्यासाठी मदत करणाऱ्या शिक्षकांवर सुद्धा कडक कारवाई हावी व आजपर्यंत फसवणुक झालेल्या विद्यार्थ्यांची व पालकांचे पैसे परत मिळावेत अशी मागणी पीडित पालक करत आहेत. आजपर्यंत तो बोगस शिक्षकाने बरेच दिवस स्वतःचे आडनाव बदलून विद्यार्थ्यांचे ॲडमिशन करून काही विद्यार्थ्यांची व पालकांची फसवणूक केली आहे. वेळोवेळी स्वतःचे गाव,नाव बदलून त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू ठेवला आहे.आणि काही राजकीय लोकांची नावे सांगून, मोठे-मोठे ओळखी सांगून त्यांच्या नावाचा गैरवापर करून त्यांच्या नावाना गालबोट लावून स्वतःच आर्थिक हित जोपासत आहेत.तर अशा बोगस संस्थाचालक व एजंटवर फसवणूक झालेल्या पालकांकडून फौजदारी गुन्हा दाखल करू,अशी चर्चा एकयाला मिळत आहे.

You've successfully subscribed to loksahyadri.com
Great! Next, complete checkout for full access to loksahyadri.com
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.