दैनिक लोक सह्याद्री मावळ प्रतिनिधी रोहित चोपडे
मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून पाचाणे ते पिंपळोली दरम्यानच्या रस्त्याच्या कामासाठी सुमारे ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या रस्त्याच्या कामाचे शुक्रवारी (दि. १७) भूमिपूजन पार पडले.
पवन मावळातील पाचाणे गावातून मुळशी तालुक्यातील गावांना जोडणारा मुरूम मातीचा कच्चा रस्ता होता. दरवर्षी पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय होतो आणि यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करता येत नव्हती. यामुळे या भागातील नागरिकांनी पाचाने ते पिंपळोली दरम्यान पक्का रास्ता बनविण्याची आमदार शेळके यांच्याकडे मागणी केली होती.
आमदार सुनिल शेळके यांनी नागरिकांनी केलेल्या मागणीची दखल घेत, पाचाणे पिंपळोली दरम्यानच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी शासनाच्या माध्यमातून सुमारे ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. शुक्रवारी (दि. १७) स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते या रस्त्याच्या भुमिपूजन पारपडले असून लवकरच या कामास सुरवात करण्यात येणार आहे. यावेळी माजी सरपंच मनोज येवले, उद्योजक सुधाकर शेळके, छबनराव कडू, मचिंद्र मराठे, रामदास येवले, अंकुश येवले, ज्ञानेश्वर येवले, अजय येवले, श्रीकांत जाधव, सरपंच नंदकूमार येवले, उपसरपंच महेंद्र येवले, ग्रामपंचायत सदस्य सुभाष येवले, सोमनाथ शिंदे, लक्ष्मण येवले, बाबाजी शेळके, दत्तात्रय मालपोटे, निवृत्ती येवले, अजिंक्य टिळे, नारायण मालपोटे, सागर बोडके, दिनेश गायकवाड, गोरख हिंगे ठेकेदार रामदास राठोड आदि मान्यवर उपस्थित होते.