माढा ता. प्रतिनिधी - श्रीकांत मासुळे
कुर्डूवाडी येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्या शुभहस्ते उपक्रमशील आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक ज्यांना नुकताच राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले, जिल्हा संपर्क संपर्क प्रमुख प्राध्यापक सुहास पाटील सर ,जिल्हा संघटक बळीराम गायकवाड, जिल्हा अध्यक्ष शशिकांत थोरात, राजकुमार सरडे, युवा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जगताप ,माढा तालुका अध्यक्ष नागेश भैया गायकवाड तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महादेव पवार यांचा सन्मान करण्यात आला. महादेव पवार हे रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल वांगी नंबर 3 शाखेमध्ये कार्यरत आहेत .विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविलेले आहेत. यामुळे त्यांना या अगोदरही अनेक राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले आहेत.
शिक्षक हे पिढ्या घडवण्याचे आणि शेतकरी पिढ्या जगविण्याचे काम करत असल्यामुळे दोघेही समाजाच्या दृष्टिकोनातून आदर्श आहेत .म्हणून शिक्षक आणि शेतकरी यांचा सन्मान सर्वांनी केला पाहिजे ,असे मत याप्रसंगी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रयत संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
