दैनिक लोक सह्याद्री - तालुका प्रतिनिधी
माढा तालुका काँग्रेस कमिटीची बैठक माढा येथे संपन्न झाली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक व युवा नेते मा. दादासाहेब साठे होते. याप्रसंगी बूथ कमिट्या स्थापन करणे व काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी करणे हे कार्यक्रम घेण्यासंदर्भात चर्चा झाली. त्याचबरोबर सोलापूर जिल्हा काँग्रेसचे लोकप्रिय अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या 04 मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम घेण्याचे ठरले.
माढा तालुक्यामध्ये विविध गावात रक्तदान, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिर, वृद्धाश्रमांमध्ये फळ वाटप, शाळांमध्ये वह्या पुस्तके वाटप, तसेच ई श्रम कार्ड नोंदणी, युनिवर्सल पास काढून देणे ,गरीब व गरजू लोकांना अन्नधान्य वाटप इत्यादी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे या कार्यक्रमास माढा नगरपालिकेच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा मा. ॲड.सौ मीनलताई साठे, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मा.सौदागरदादा जाधव, माढा तालुका युवक काँग्रेस चे
अध्यक्ष
मा.संजय काका पाटील,उपनगराध्यक्ष सौ.कल्पणाताई जगदाळे.काँग्रेस कमिटी चे जिल्हा सरचिटणीस दिपकराव खोचरे- पाटील,
जिल्हा संघटक जाहीर मनेर सर, जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन खैरे, ज्येष्ठ नेते अशोक आप्पा पाटील ,टेंभुर्णी शहर काँग्रेसचे सोमा काका कदम ,भीमराव अण्णा बंडगर, नगरसेवक आजिनाथ माळी, नितीन साठे, कुर्डूवाडी शहराध्यक्ष फिरोज खान , कुर्डूवाडी अल्पसंख्याक शहर अध्यक्ष हमीद शिकल्कर,भारत नवले. सौ जयश्री जाधव ,नागनाथ हांडे,कुमार तोडकर,इत्यादी उपस्थित होते. याप्रसंगी नूतन नगराध्यक्षपदी व उप नगराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मा.सौ मिनलताई साठे व कल्पणाताई जगदाळे यांचा सत्कार तालुका काँग्रेस च्या वतीने करण्यात आला. दादासाहेब साठे ,संजयकाका पाटील,सौदागर जाधव ,दीपक खोचरे यांची मार्गदर्शन पर भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जहीर मनेर यांनी तर आभार सोमनाथ कदम यांनी मानले.
