दैनिक लोकसह्याद्री ई न्युज
प्रतिनिधी लोणी काळभोर - हनुमंत सुरवसे
कोरोना सारख्या महामारीच्या संकटामुळे मागील ६२२ दिवस शाळा बंद होत्या, महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार १ ली ते ४ थी वर्गाच्या शाळेचा आज शुभारंभ व विद्यार्थ्यांचा स्वागतोत्सव आज करण्यात आला, व आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५ वा महापरीनिर्वाण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रम प्रसंगी लोणी काळभोर चे सरपंच राजाराम काळभोर, मा.उपसरपंच विद्यमान ग्रा.पं. सदस्य योगेश काळभोर, मा.उपसरपंच राजेंद्र आबा काळभोर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, युवा नेते अमित काळभोर, ललिता काळभोर, पोलीस पाटील दादा पाटील काळभोर, रयत क्रांती संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत काळभोर, पत्रकार सचिन काळभोर, दिगंबर जोगदंड, लोणी काळभोर जिल्हा परिषद शाळा नं.०१ च्या मुख्यध्यापिका मंगला भोसले, लोणी काळभोर जिल्हा परिषद शाळा नं. ०२ च्या मुख्यध्यापिका लता सोरटे, उर्दू शाळेच्या मुख्यध्यापिका अल्मास सालुटगी मॅडम, व सर्व शिक्षक वृंद सूत्र संचालन पृथ्वीराज काळे,मेमाणे सर यांनी केले, केंद्र प्रमुख भरत इंदलकर यांच्या नियंत्रणाखाली हा सर्व कार्यक्रम आनंदात पार पडला.