latest

लोणी काळभोर हद्दीमधून सासवडमार्गे पुण्याचे दिशेने मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा घेऊन जाणाऱ्या एका महिंद्रा बोलेरो पिक अपला शहर पोलीस गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने अडवून लाखो रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला आहे.

दौंड ता.‌प्रतिनीधी‌ - परशुराम निखळे

गुन्हे शाखा, युनिट ६, पुणे शहर पोलीस पथकाने सापळा रचून वडकी गावचे हद्दीत सकाळ प्रेस समोर,पुणे सासवड रोड येथे महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एमएच-१२/एनएक्स/५७१८ ही ताब्यात घेत त्याचा पिकअप चालक शाहरुख इस्लाम शेख (वय २३ वर्षे, रा. घोरपडे वस्ती, अंबिका माता मंदिराजवळ,लोणी स्टेशन,लोणी काळभोर,ता.हवेली,जि.पुणे) व गुटख्याचा माल खरेदी करणारा इसम सुरेश मिलापचंद ओसवाल (वय-४४ वर्षे,रा.महात्मा फुलेनगर,माळी मळा,राजेंद्र पेट्रोल पंपाचे समोर, लोणीकाळभोर,ता.हवेली,जि.पुणे) यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडील ७,४३,६००/- रुपये किंमतीचा ४३५ किलो विमल गुटखा व‌‌वाहतूकीकरिता वापरलेला ४,५०,०००/- रु किंमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकूण ११,९३,६००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

हा माल बाजारा मध्ये दुप्पट किंमतीने विकला जात असल्याचे निदर्शसनास आले‌‌असून बाजारभावाने जप्त गुटखा मालाची किंमत लाखोंमध्ये जात आहे. पिकअप चालक शाहरुख इस्लाम शेख व गुटख्याचा माल खरेदी करणारा इसम सुरेश मिलापचंद‌‌ओसवाल यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्र.२०२२ भादवि कलम १८८,२७२,२७३,३४, व‌‌अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम ३०(२)(अ),२६(२)(I),२६(२)(IV),अन्न सुरक्षा मानके कायदा प्रोव्हिबिशन अॅण्ड‌‌रिस्ट्रीक्शन ऑन सेल नियमन २०११ चे नियमन २.३.४ तसेच सहवाचन ३(1)ZZ चे उल्लंघन केल्याने नियम ५९ अन्वये‌‌गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर,श्री.अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह-आयुक्त, डॉ.रविंद्र शिसवे, मा.अपर पोलीस आयुक्त,श्री.रामनाथ पोकळे ,गुन्हे शाखा,पुणे, मा.पोलीस उप-आयुक्त,श्री.श्रीनिवास घाडगे,‌‌गुन्हे शाखा पुणे शहर, मा.सहा.पोलीस आयुक्त,गुन्हे-१,पुणे शहर,श्री.गजानन टोम्पे, मा.सहा.पोलीस आयुक्त,गुन्हे-२,श्री.‌‌नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा,युनिट-६ चे पोलीस निरीक्षक,श्री.गणेश माने, सहा.पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पो.उप.नि.सुधीर टेंगले, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, नितीन‌‌शिंदे, नितीन मुंढे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर व ज्योती काळे यांनी केली आहे.

‌                                                        

You've successfully subscribed to loksahyadri.com
Great! Next, complete checkout for full access to loksahyadri.com
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.