दौंड रावणगाव परशुराम निखळे
दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील अर्थकम प्रा. ली कंपनीमधील एका कामगाराच्या पायावर ट्रॉली व केमिकल भरलेला ड्रम पडल्याने कामगाराच्या पायाला गंभीर दुखापत होऊन संबंधित कामगाराचा पाय 2 ते 3 जागेवरती मोडला असल्याचं बोललं जातंय.अर्थकेम कंपनीत आठ ते दहा दिवसांपूर्वी झालेला अपघात संबंधित औद्योगिक सुरक्षा अधिकारी यांना देखील या अर्थकेम कंपनीने कळवले नसून.या कंपनीत अनेक वेळा छोटे मोठे अपघात होत असल्याचं बोललं जातंय. तरी संबंधित कंपनी औद्योगिक सुरक्षा अधिकारी यांना कळवत नसल्याचं बोललं जातंय. संबंधित कंपनी कामगारांना कसल्याही प्रकारची सुरक्षा ( सेफ्टी ) देत नसून संबंधित कंपनी कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या जीवाशी खेळत असल्याचं चित्र दिसत आहे. या कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील अनेक छोट्या मोठ्या कंपन्या आहेत या छोट्या-मोठ्या कंपनीमध्ये असे अनेक छोटे-मोठे अपघात होत असतात परंतु कंपनी कामगारांना सुरक्षा उपकरणे देत नसल्याने असे अपघात होत असतात अशा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एखाद्या कामगाराचा जीव देखील जाऊ शकतो तरी संबंधित कंपन्यांनी कामगारांना सुरक्षा साधनं देण्यात यावी तसेच त्या कामगारांच्या जीवाशी खेळू नये असे देखील या औद्योगिक वसाहत मधील कामगारां मधून बोलले जातंय. तरी संबंधित औद्योगिक सुरक्षा अधिकारी या अर्थकेम कंपनीवर काय कारवाई करणार हे पाहणं निश्चित ठरतंय.
या अपघाताबाबत आम्हाला संबंधित कंपनीने कसल्याही प्रकारे कळवले नसून सदर अपघाता बाबत माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करू
अखिल घोगरे
औद्योगिक सुरक्षा अधिकारी पुणे,