latest

कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे, समोर कामगारांच्या विविध मागण्या करिता बहुद्देशीय कामगार संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन...

दैनिक लोकसह्याद्री प्रतिनिधी‌‌श्री.हनुमंत सुरवसे

मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे, येथे बहुद्देशीय कामगार संघटनेचे आंदोलन चालू असून  आंदोलनास सर्व पदाधिकारी व महिला कामगार उपस्थित राहून बेमुद धरणे आंदोलन करत आहेत, आंदोलनास आज ८ दिवस होवून गेले तरी देखिल प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचे बहुद्देशीय कामगार संघटनेचे सर्वेसर्वा नामदेव घोरपडे यांनी सांगितले .‌‌Amit Enterprizees (अमित ऐन्टरप्रायजेस) या ठेकेदाराचे टेन्डर रद्द करून त्या ठिकाणी कामगाराचे हित जपणाऱ्या ठेकेदारांस सदरचे टेन्डर देण्याची मागणी केली, Amit Enterprizees(अमित ऐन्टरप्रायजेस)यांनी टेन्डर मिळविण्या करिता बनावट कागदपञे सादर करून टेन्डर मिळवले असल्याची तक्रार कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे कडे केली असून संबधित ठेकेदारां विरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी नामदेव घोरपडे यांनी केली आहे.

Amit Enterprizees (अमित ऐन्टरप्रायजेस) ठेकेदाराची निविदा पास करण्या करिता व संबधित ठेकेदारांस टेन्डर मिळावे म्हणून संबधित अधिकाऱ्यांनी संगनमत केले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला, आंदोलनाला ८ दिवस होत आली असून याबाबत समिती कडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याची खंत नामदेव घोरपडे यांनी व्यक्त केली.

कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड मध्ये टेन्डर प्रक्रीये मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याबाबत कोणतीही चौकशी समिती नेमण्यात आलेली नाही व वरिष्ठ पातळी वरून कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही या भ्रष्टाचारात वर पासून खाली पर्यन्त भ्रष्टाचार चालू आसल्याचे आंदोलन कर्त्याचे म्हणने आहे.बहुद्देशीय कामगार संघटनेच्या आंदोलनाला समिती कडून काय प्रतिसाद मिळतोय हे पाहणं अवस्तुकाचे ठरेल...

You've successfully subscribed to loksahyadri.com
Great! Next, complete checkout for full access to loksahyadri.com
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.