latest

कोरोना सारख्या अभूतपूर्व संकटाशी तोंड देताना कष्टाची रक्कम ही इंदापूर येथील बेकायदा भिशी चालकांकडे अडकल्यामुळे सभासदां संतप्त..

इंदापूर ता प्रतिनिधी - अनिल गुळूमकर

बार्शी येथे नुकत्याच झालेल्या विशाल फटे आर्थिक फसवणूक प्रकरणा नंतर महाराष्ट्रातील विविध भागातून आर्थिक फसवणुकीची प्रकरणे बाहेर येऊ लागली आहेत. त्यातलेच इंदापूर तालुक्यातील दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक फसवणुकीचे भिशी प्रकरण आज इंदापूर येथे समोर आले फसवणूक झालेले व्यापारी, शेतकरी, मजूर, नोकरदार इत्यादी नागरिक एकत्र येऊन त्यांनी इंदापूर पोलीस स्टेशन आणि इंदापूर तहसील कार्यालय या ठिकाणी आपल्याला न्याय मिळावा यासाठी निवेदन सादर केले. याप्रकरणी शिवसेनेचे इंदापूर शहराध्यक्ष श्री महादेव सोमवंशी यांनी पुढाकार घेतला आणि या सर्व फसवणूक झालेल्या नागरिकांना एकत्र आणण्याचे काम केले. महादेव सोमवंशी यांच्या वतीने सादर केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की इंदापूर शहरातील व तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, मजूर व नोकरदार यांचा विश्वास संपादन करून काही भीसी चालक यांनी मागील काही वर्षांपासून सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात पैसे जमा करून घेतले असून त्याची रक्कम ही अंदाजे 200 कोटींपेक्षा जास्त आहे व सदर रक्कम आता ते भिशी सभासदांना परत करण्यास असमर्थता दाखवत आहेत. यापैकी काही भिशी चालकांची नावे त्यांनी निवेदनात जाहीर केलेली आहेत ती खालील प्रमाणे उषाप्पा मारुती बंडगर, शंकर मारुती बंडगर, उत्‍तम मारुती बंडगर, नारायण सायबु वाघमोडे, परशुराम मारुती वाघमारे, गोविंद रामदास जाधव, महादेव दशरथ हराळे, राजू वसंत शेवाळे, विजय शिवाजी शेवाळे/ अजय शिवाजी शेवाळे, गणेश शिवाजी शेवाळे, धनंजय भागवत कांबळे, सचिन लक्ष्मण कुंभार, काशिनाथ एकनाथ म्हेत्रे, संजय दत्तात्रय गणबोटे, संतोष बाबुराव झिंगाडे, प्रशांत सुरेश कुंभार आदी भिषी चालकांनी बेकायदेशीर भिशी चालवून आर्थिक फसवणूक केलेले आहे. सद्यपरिस्थितीत सर्व भिशी सभासद एकत्र येऊन प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळावा आपले कष्टाचे पैसे परत मिळावेत म्हणून एकत्र आलेले आहेत.
कोरोना सारख्या अभूतपूर्व संकटाशी तोंड देताना कष्टाची रक्कम ही बेकायदा भिशी चालकांकडे अडकल्यामुळे सभासदांचे संसार, मुलांची शिक्षणे, वैद्यकीय खर्च इत्यादी अडचणींना सामोरे जाताना त्यांना जो त्रास होत आहे यापासून त्यांना न्याय मिळावा म्हणून पोलीस प्रशासन तसेच संबंधित अधिकारी कशाप्रकारे मदत करतात आणि बेकायदा भिशी चालकांच्या विरोधात काय कारवाई करणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

You've successfully subscribed to loksahyadri.com
Great! Next, complete checkout for full access to loksahyadri.com
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.