latest

कोरोना नियमांचे उल्लंघन करत गर्दी जमविणाऱ्या हॉटेल व्यावसायिकावर गुन्हा दाखल

दैनिक लोक सह्याद्री

प्रतिनीधी
रोहित चोपडे

लोणावळा दि.०९ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध निर्बंध लावण्यात आलेले असताना या सर्व नियमांना हरताळ फासत लोणावळ्यातील एका हॉटेल व्यावसायिकाने एका कंपनीच्या रहिवासी कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. या कॉन्फरन्स मध्ये एका हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र जमविले होते. याठिकाणी अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते तर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. याची माहिती लोणावळा शहर पोलीस ठाण्यात समजल्यानंतर सदर हॉटेल व्यावसायिकावर भादंवी कलम 188/269 व साथरोग नियंत्रण कायदा कलम ( 3 ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी दिली.

शैलेश शशिकांत आंदुरे (वय 42, हॉटेल ड्रिमलँन्ड व्यवस्थापक, लोणावळा) यांच्यावर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे महाराष्ट्र राज्यात ओमायक्रोन व कोरोना रुग्ण स्फोट झाल्या सारखे वाढत असताना लोणावळा येथील एका रिसॉर्ट हॉटेल मध्ये शासनाच्या आदेशाला हरताळ फासून शेकडो
नागरिकांचे सेमिनार जमवलेचा प्रकार घडला आहे. महाराष्ट्र राज्यात तसेच पुणे जिल्ह्यातील अनेक पर्यटन केंद्र, मॉल, रेस्टॉरंट यांना कडक निर्बंध लागू असताना एका डायरेक्ट सेल्लिंग कंम्पनी ने कुठलीही परवानगी न घेता शनिवारी रेसिडेन्स प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कॉन्फरन्सची माहिती समजल्यानंतर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रविण गोसावी, नितिन सुर्यवंशी यांनी सदरची कारवाई केली.

You've successfully subscribed to loksahyadri.com
Great! Next, complete checkout for full access to loksahyadri.com
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.