पुणे प्रतिनिधी
पिंपळे जगताप येथील महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालयात पुणे येथील विवो कंपनी व ऊर्मी फाउंडेशन यांच्या वतीने सीएसआर निधी अंतर्गत शालेय साहित्य विद्यालयात प्रदान करण्यात आलेल्यामध्ये विद्यालयात 1 ई लर्निंग संच ,1 वॉटर फिल्टर, 5 ग्रीन बोर्ड,एच पी ऑल इन वन प्रिंटर यूपीएस ,सॅनिटरी वेंडिंग मशीन, इत्यादी शैक्षणिक वस्तू व साहित्य देण्यात आले.सदर कार्यक्रमास कंपनीचे जयदिप मोहिते, शिवकांत चव्हाण ,गणेश महामुनी ,गणेश मांढरे, ऊर्मी संस्थेचे सचिव राहुल शेंडे, सरपंच सोनल ताई नाईकनवरे, संस्थेचे सचिव विश्वासराव जगताप ,संचालक रामचंद्र टाकळकर, ज्ञानेश्वर शितोळे, माजी उपसरपंच सागर शितोळे, चेअरमन रमाकांत रायकर ,महेश अप्पा जगताप,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल जगताप, ,विलास भोंगळे ,मुख्याध्यापक बाळासाहेब वाणी उपस्थित होते
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जगताप यांनी तर आभार पोपट सोनवणे यांनी मानले