सोलापूर प्रतिनिधी:- दि.11 मा. जिल्हाधिकारी व मा. जिल्हा पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या निर्देशानुसार यात्रेच्या कालवधीमध्ये वाहन पार्किंग व्यवस्था , बेकायदेशीररित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या व कोविड - 19 च्या सूचनांचे पालन न करणाऱ्या वाहनांविरूध्द स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेकरीता प्रादेशि परिवहन कार्यालय, लातूर सांगली, सातारा, उस्मानाबाद व सोलापूर अशी सहा पथके तयार करण्यात आली असून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर यांच्या नियंत्रणाखाली पंढरपूर येथील कार्तिकी वारी दरम्याण ही तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी , सोलापूर यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
