दैनिक लोकसह्याद्री ई न्युज
पुणे प्रतिनिधी
हनुमंत सुरवसे
महिला बालकल्याण विकास जिल्हा परिषद पुणे योजनेअंतर्गत आज जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती हवेली यांच्यामार्फत आज दोनशे सायकलींचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी मुलींना शाळेत ये-जा करण्यासाठी लांबून पायपीट करत शाळेत यावे लागत होते, महिला बालकल्याण विकास जिल्हा परिषद पुणे योजना अंतर्गत जिल्हा परिषद सदस्य सुनंदाताई शेलार व पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य सनी शेठ काळभोर यांनी पुढाकार घेऊन यांच्या माध्यमातून आज दोनशे मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले, सायकल वाटप केल्यानंतर मुलींच्या चेहऱ्यावरचे हसू आनंद गगनात मावण्याजोगा होता, यावेळी कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सुनंदाताई शेलार, पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्यमान सदस्य सनी शेठ काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास आण्णा काळभोर, माधव आण्णा काळभोर, पंचायत समिती सभापती अनिल टिळेकर, सरपंच राजाराम काळभोर, उपसरपंच संगिताताई काळभोर, माजी सरपंच चंदर शेलार, माजी उपसरपंच राजेंद्र आबा काळभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आप्पासाहेब काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, माजी कॅबिनेट मंत्री सूर्यकांत गवळी, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, ज्योती अमित काळभोर, ललिता काळभोर, माधुरी राजेंद्र काळभोर, युवा नेते अमित काळभोर, युवराज काळभोर, पत्रकार सिताराम लांडगे, व सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी लोणी काळभोर ग्रामस्थ उपस्थित होते.