latest

जिल्हा परिषद लोकरेवस्ती शाळेच्या वर्धापनदिनी शैक्षणिक साहित्याचे वाटप..

करकंब प्रतिनिधी-

पंढरपूर तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा लोकरे वस्ती करकंब शाळेच्या १७व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने  मुलांना वही, पेन, पेन्सिल, पट्टी इ.शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे. करकंब केंद्रातील आदर्श शिक्षक श्री दत्तात्रय खंदारे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री विवेक शिंगटे  उपस्थित होते. शाळेची स्थापना २५जुलै २००५ रोजी वस्तीशाळेच्या रूपाने झाली. येईल त्या प्रत्येक परिस्थितीत शाळेच्या प्रगतीसाठी पालकांसह गावकऱ्यांनी वेळोवेळी सहकार्य केले. शाळेच्या स्थापने पासून श्री नागनाथ घाटूळे यांनी आजपर्यंत शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणात खंड पडू दिला नाही. त्यांना श्री विनोद सावंत, श्री महेश धोंगडे यांची विशेष सहकार्य लाभले. या शाळेला परिसरातील गुणवत्तापूर्ण शाळा असा लौकिक आहे. शाळेचा विद्यार्थी विकासात खूप मोलाचे स्थान आहे, विद्यार्थी शाळेचा भाग झाल्यापासून खऱ्या अर्थाने त्याच्या प्रगतीसाठी सुरुवात होते. चिखलाच्या गोळ्यांना  जसा एखादा कारागीर आकार देतो, त्याप्रमाणे शिक्षकाला मुलांच्या जीवनाला आकार द्यावा लागतो. शाळेची एकूणच १७ वर्षातील प्रगती करकंब परिसरास लौकीकस भर घालणारी आहे असे यावेळी श्री दत्तात्रय खंदारे यांनी यावेळी सांगितले.शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री धनाजी लोकरे, केंद्रीय मुख्याध्यापक श्री विजय शिंदे, श्री शरद गावडे व करकंब केंद्रातील शिक्षक श्री शेखर कोरके, श्री संतोष देगावकर,श्री रविकिरण वेळापूरकर, श्री गजानन जाधव, श्री सोमनाथ देवकते, श्री संतोष भोसले, श्री फैयाज इनामदार, पालक श्री दशरथ बनकर, श्री भारत रेडे, श्री दीपक शिंगटे, श्री विशाल रेडे, श्री हणमंत लोकरे, श्री आशिष इदाते  अंगणवाडी सेविका श्रीमती सुजाता शिंदे, श्रीमती राधिका रेडे उपस्थित होते.

You've successfully subscribed to loksahyadri.com
Great! Next, complete checkout for full access to loksahyadri.com
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.