दैनिक लोक सह्याद्री ई न्युज
(लोणी काळभोर प्रतिनिधी) - हनुमंत सुरवसे
पुणे-सोलापूर महामार्गा लगत लोणी काळभोर बोरकर वस्ती याठिकाणी बेकायदा वाळू उपसा जोरदार प्रमाणात सुरू आहे, वाळू बंद होऊन पाच वर्ष होऊन देखीलही आज लोणी काळभोर बोरकर वस्ती या ठिकाणी जोरात प्रमाणात वाळू उपसा करण्यात येत आहे, वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या या कोऱ्या नंबर प्लेट असून त्या गाड्यांवर कसल्याही प्रकरचे आर. टी. ओ.पासिंग नंबर नाही, ड्रायव्हर ला विचारपूस केली असता ती गाडी (एम.एच.१२ एफ झेड ७९५३) अशी आहे असे सांगण्यात आली आहे. अधिक माहिती घेतली असता ती वाळू धुमाळ यांच्याकडून घेतली आहे असे ड्रायव्हर कडून माहिती मिळाली असून,
तहसीलदार विजय कुमार चोभे यांना संपर्क साधला असून त्यांनी कारवाई होईल अशा प्रकारचे आश्वासन दिले.
तरी याकडे हवेलीचे तहसीलदार यांचे बेकायदा वाळू उपसावर जाणीवपूर्वक डोळेझाक तर होत नसेल ना...? या वाळू व्यवसाय वादातुनच खून खुनाचा प्रयत्न असे या सारखे गंभीर गुन्हे घडले आहेत तरी या वर हवेलीचे तहसीलदार काय कारवाई करतील ? याकडे लक्ष वेधून आहे.