latest

हुलगे यांच्या ऊस शेतीस वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांची भेट...

दत्तात्रय सुरवसे
बेंबळे प्रतिनिधी
:- बेंबळे येथिल सोमनाथ भास्कर हुलगे यांनी तालुक्यात अभ्यासू व प्रयोगशील ऊस उत्पादक शेतकरी म्हणून  नावलौकिक मिळवला आहे. सेंद्रिय घटकांसोबत रासायनिक खतांचा योग्य मेळ घालत गतवर्षी जवळपास एक एकर शेतीत ११० टन उच्चांकी को ८६०३२ या वाणाच्या उसाचे उत्पादन घेतले गेले.  उत्पादनवाढीसाठी कृषीरत्न संजय दादा माने यांच्या मार्गदर्शनाखाली एकरी १०० टनाहून अधिक ऊसाच्या उत्पादन घेऊन हुलगे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे आदर्श तयार केला आहे. दरम्यान हुलगे यांच्या ऊस शेतीस प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ श्री आर जी यादव व डॉ. सौ पी एस देशमुख यांनी मार्गदर्शनपर भेट दिली.

यावेळी सोमनाथ हुलगे यांनी उच्चांकी ऊस उत्पादनाबाबत रहस्याचा उलगडा करताना सांगितले शेतात एकरी तीन टन शेण खत आणि दोन टन कारखान्याची मळी विस्कटली जाते. पुन्हा नांगरणी आणि सरी करून रान तापवले जाते. खतांचे योग्य व्यवस्थापन करून नत्र, स्फुरद, पालाश आणि विरघळणाऱ्या जिवाणूंचा वापर करून उसाची लागवड केली जाते. लागवड करताना बेणे प्रक्रियेला अधिक महत्त्व दिले जाते. ऊस उत्पादनात  को ८६०३२ या वाणालाच पसंती असते. लागवडीच्या उसाचे एकरी १००ते ११० टन तर खोडव्याचे उत्पादन ७० टनांपर्यंत मिळते. सन २०१६ पासून पाच फुटी सरीचा वापर करण्यास सुरुवात केली. एक डोळा पद्धतीचा वापर असतो. पाच बाय दोन फूट असे लागवडीचे अंतर असते. सुमारे १२ एकरांवर ठिबक सिंचन केले आहे. गरजेनुसार पाटपाण्याचाही वापर होतो. शास्त्रीय व तांत्रिक बाबींचा वापर करण्यावर भर असतो. बेसल डोस, बीजप्रक्रियेला महत्त्व असते. पाचटाचाही सरीत वापर होतो. याचबरोबर ठिबक सिंचनाद्वारे जिवामृताचा वापर करून जमिनीची सुपिकता वाढविण्यावरसुध्दा भर दिला गेला. यामुळे  एकरी १०० टनाहून अधिक उत्पादन यशस्वीपणे घेता येते.

हुलगे यांची ऊस क्षेत्रातील प्रगती पाहून शास्त्रज्ञांनी समाधान व्यक्त केले, सोलापूर जिल्ह्यामध्ये को ८६०३२ या वाणासाठी वातावरण अनुकूल आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी हुलगे यांचा आदर्श घेत ऊसाचे अधिक उत्पादन घेवून आपली अर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावे असे आवाहन केले. दरम्यान शास्त्रज्ञ श्री यादव व डॉ सौ.देशमुख यांच्या हुलगे दाम्पत्यांनी शाल श्रीफळ देवून सन्मान केला. सदरप्रसंगी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी नारायण लगड व राजमाने यांच्यासह  शेतकी अधिकरी बर्गे साहेब व ढवळे साहेब हे उपस्थित होते.

You've successfully subscribed to loksahyadri.com
Great! Next, complete checkout for full access to loksahyadri.com
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.