इंदापूर ता. प्रतिनिधी - अनिल गुळूमकर
इंदापूर तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व कृषी पदवीधरांची सहविचार सभा शनिवार दिनांक 12/ 2/ 2022 रोजी संपन्न झाली. सदर कार्यक्रमांमध्ये 1967 मध्ये कृषी पदवी प्राप्त झालेले डॉक्टर शंकरराव मगर सर तसेच डॉक्टर दादासाहेब कोरटकर ते शैक्षणिक वर्ष 2019 -20 मध्ये पदवी प्राप्त झालेले सर्व कृषी पदवीधर एकत्रित आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय शंकररावजी मगर सर म्हणाले की, इंदापूर तालुक्यामध्ये कृषी क्षेत्रात क्रांती घडवायची असेल तर एकात्मिक खत पद्धती वापरली पाहिजे तसेच कृषी वरती आधारित अनेक मोठे प्रकल्प उभा केले पाहिजेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भारत सरकारच्या कृषी क्षेत्रातील योजना साध्या पद्धतीने समजण्यासाठी कृषीचे साप्ताहिक काढण्याचा सल्लाही त्यांनी कृषी पदवीधरांना दिला. तसेच इंदापूर तालुक्यामध्ये कृषी पदवीधरांनी एकत्रित येऊन कृषी महाविद्यालय चालू करण्याची अपेक्षाही व्यक्त केली. तसेच अमोल जी भिसे म्हणाले की, हा स्नेहमेळावा फक्त कार्यक्रमा पुरताच मर्यादित न राहता भविष्यात कृषी महोत्सव ,कृषी परिषद, असे अनेक उपक्रम नवीन कृषी पदवीधरांसाठी आपण राबवले पाहिजेत. प्रत्येक वर्षी कृषी पदवीधरांचा स्नेहमेळावा दिवाळीच्या पाडव्याला होईल असे सर्वानुमते ठरविण्यात आले .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय राजेंद्र पवार यांनी केले तर प्रस्तावना भरत हरणावळ सर यांनी केली आणि आभार प्रदर्शन मंगेश लोणकर यांनी मांडले.

http://epaper.loksahyadri.com/