latest

ग्राम परिवर्तन संकल्पनेसाठी गावकऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करावे पो.नि.सुरेश निंबाळकर

दत्तात्रय सुरवसे
बेंबळे प्रतिनिधी:- ऑपरेशन" ग्राम परिवर्तन" या संकल्पनेला प्रत्यक्षात मूर्त स्वरूप आणण्यासाठी टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी टेंभुर्णी गट हद्दीत असलेल्या बेंबळे गावी भेट देऊन गावकऱ्यांशी  चर्चा केली , माहिती सांगितली व मार्गदर्शन केले. याप्रसंगी पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर म्हणाले की 'माझे गाव माझी सुरक्षा' व 'माझे गाव माझी जबाबदारी' अंतर्गत, गावातील दारू, मटका ,जुगार, वेश्याव्यवसाय आदी अवैध धंद्यांचा समूळ उच्चाटन करणे हे पोलिसांचे ध्येय आहे, परंतु यासाठी आम्हाला स्थानिक गावकर्‍यांची साथ व सहकार्य मिळणे अत्यंत मोलाचे ठरणार आहे. यापुढे आपत्ती व्यवस्थापन ( डिझाँस्टर मॅनेजमेंट ) अंतर्गत लोकांना जागृत करण्यासाठी गावाच्या मध्यभागी उंचावर' सायरन' बसवण्यात येतील तसेच चोरी किंवा इतर गुन्हेगारीचा तात्काळ शोध व्हावा म्हणून व गुन्हेगार तातडीने पोलिसांच्या हाती लागावा यासाठी गावातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत, गावातील नागरिकांनी  सुरक्षिततेसाठी,जबाबदारी म्हणून पोलिसांना व ग्राम सुरक्षा दलास सहकार्य करणे आवश्यक आहे.

याप्रसंगी सरपंच विजय पवार, उपसरपंच नाना भोसले ,ग्रामपंचायत सदस्य भारत कोळी, बबलू काळे, दादा काळे तसेच प्राध्यापक औदुंबर लोंढे, अनिल शिंदे, सिद्धेश्वर शिंदे, अभय भोसले पोपटराव काळे, संभाजी चोरमल, धनु शिंदे, फडे बंधु तसेच पोलीस यंत्रणेचे संजय भानवसे, अश्फाक शेख ,अभिमन्यू गुटाळ, सहाय्यक पठाण, तुकाराम माने- देशमुख पोलीस मित्र अभिमान किर्ते दादा काळे, सुरेश कांबळे, नागनाथ मस्के, शरद कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पोलीस पाटील बिभीषण कीर्ते यांनी केले.

चौकट......।।

कोरोना महामारी विषयी बोलताना पो.नि.सुरेश निंबाळकर म्हणाले की सध्या कोरोना महामारी कमी झालेली आहे.शाळा,कॉलेज,मंदिरे उघडली आहेत,आठवडा बाजार व स्थानिक,एकत्रित घरगुती व सार्वजनिक कार्यक्रमांना व धार्मिक सण- उत्सवाना शासनाने परवानग्या दिलेल्या आहेत तरीपण कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले आहेत पण पूर्ण बंद झाले नाहीत हे लक्षात ठेवून नागरिकांनी,माझे कुटुंब माझी जबाबदारी व सुरक्षा हे शासनाचे ध्येय समोर ठेवून प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. बाहेर फिरताना मास्क वापरा, वेळोवेळी हात पाय स्वच्छ धुवा,गर्दी न करता सण उत्सव साजरे करा, निष्कारण रिकामे फिरू नका,लसीकरण करूनघ्या गर्दी करू नका व आपल्या गावात कायदा-सुव्यवस्था व शांतता सुरळीत राहण्यासाठी पोलिसांना सहकार्य द्या असेही निंबाळकर यांनी या प्रसंगी सांगितले.
You've successfully subscribed to loksahyadri.com
Great! Next, complete checkout for full access to loksahyadri.com
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.